संभाजीनगर जिल्हा प्रतिनिधी/
संभाजीनगर – शुक्रवारी हे कुटुंब अमरावतीहून पुण्याच्या दिशेने जात असताना वाळूजपासून तीन किलोमीटर पुढे लिंबेजळगाव परिसरातील टोलनाक्याजवळ हा अपघात घडला छत्रपती संभाजीनगरमध्ये भीषण अपघात घडला आहे. या अपघातात एकाच कुटुंबातील चार जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे.
यामध्ये दीड महिन्यांच्या बाळासह आई, आजी आणि सात वर्षांच्या चिमुकलीचा समावेश आहे. शुक्रवारी हे कुटुंब अमरावतीहून पुण्याच्या दिशेने जात असताना वाळूजपासून तीन किलोमीटर पुढे लिंबेजळगाव परिसरातील टोलनाक्याजवळ हा अपघात घडला. मिळालेल्या माहितीनुसार, दहा वर्षांनंतर झालेल्या बाळाचे बारसे आटोपून हे कुटुंब पुण्याला जात होतं.