उमरी तालुका प्रतिनीधी/ उद्धव मामडे
उमरी – नायगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार राजेश पवार यांची विकासाची घोडदौड चालू ससून उमरी शहरातील नवीन पाणीपुरवठा योजनेसाठी 26 कोटी 34 लक्ष रुपयाचा निधी मंजूर करून आणल्याने शहरातील भविष्य काळातील पाणीपुरवठाचा प्रश्न मिटणार आहे.
शहरातील वाढती लोकसंख्या व वाढती वस्ती याचा विचार करत या भागाचे आमदार राजेश पवार यांनी शहराच्या विकासासाठी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून आणून विकासाची कामे प्रगतीपथावर नेत आहे . यात उमरी शहरवासी यांच्या अति महत्त्वाचा असलेला पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी शासनाकडे पाठपुरवठा करून नवीन पाणीपुरवठा योजनेसाठी 26 कोटी 34 लक्ष रुपयाचा निधी उपलब्ध करून आणला आहे ज्यामुळे शहरातील अनेक भागात नवीन पाईपलाईन, नवीन वस्तीत पाण्याची टाकी व पाईपलाईन, जुन्या फिल्टरवर नवीन यंत्रसामुग्री सह पाणीपुरवठा करणाऱ्या कुदळा तलावावर नवीन मोटारी तसेच या ठिकाणी विद्युत पुरवठ्यासाठी एक्सप्रेस फिटर लाईन होणार आहे ज्यामुळे कुदळा तलावावर विद्युत पुरवठा 24 तास चालू राहणार आहे तर शहरवासीयांना दररोज पाणीपुरवठा होऊ शकते. एकंदरीत भरमसाठ निधी उपलब्ध झाल्याने शहरातील नागरिकांना स्वच्छ जल शुद्धीकरण करून पाणी मिळणार आहे ज्यामुळे येणाऱ्या भविष्यकाळात पाणीटंचाई किंवा पाणी प्रश्न निर्माण होणार नाही या दूरदृष्टीने आमदार राजेश पवार यांनी केलेले प्रयत्न सार्थ जाणार आहे त्यांच्या या विकासाच्या घोडदौड भूमिकेने उमरी शहरवासीयांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.