भोकर ता.प्रतीनीधी/माली पाटील
भोकर- निवडणुकीच्या अनुषंगाने नेते, कार्यकर्ते पळापळीत सैरवैर असताना मात्र बहुजनाच बहुआयामी नेतृत्व असलेले नागनाथ घिसेवाड यांच वादळ घराघरात म्हणजे स्लो पाईजन सारख पसरत असुन तालुक्यातील प्रत्येक तांड्यावर तरुणांच्या साथीन आपला शेवटचा राजकीय लढा फुलवत असुन बंजारा समाज सुद्धां अब की बार घिसेवाड आमदार म्हणून मोठ्या प्रमाणावर निवडुन आणण्याचा वसा घेतला असल्याचे सध्याचे चित्र आहे.
भोकर विधानसभा निवडणुक सन २०२४ लवकरच पडघम वाजणार असुन या निवडणुकीसाठी अनेक जण आपापल्या पक्षाकडून तयारी करीत आहेत.या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नेते कार्यकर्ते यांची पक्ष बदला ची रेलचेल सुरू आहे.मतदार सुद्धा पळणार्याकडे लक्ष ठेवुन आहे.सध्याच राजकारण इतकं गलिच्छ झाले की, कोण कधी कुठल्या पक्षात आहे हेच कळत नाही. काही पक्ष बदलणारे म्हणतात की,ज्या चव्हाण कुटुंबाला काँग्रेस पक्षाने एवढं मोठं केलं की मुख्यमंत्री,संरक्षण मंत्री, केंद्रीय गृहमंत्री, राज्यात अनेक मंत्री पद देऊन ते लोक पक्ष बदलतात तर आमचं काय घेऊन बसलात असं उघडपणे बोलल्या जात आहे.तेव्हा राजकीय स्तर कोण्या तळाला गेली आहे हे यावरून दिसुन येते.
भोकर विधानसभा मतदार संघात बंजारा समाजातील काही तरुण युवक यावेळी नागनाथ घिसेवाड यांना निवडून आणण्याचा वसा घेतला असुन ते तरुण नागनाथ घिसेवाड यांच्या सोबत स्वताच्या दोन ते तीन गाड्या घेऊन प्रत्येक तांड्यावरती जात आहेत.बंजारा समाज ही उत्स्फूर्तपणे साथ देत असल्याचे दिसून येत आहे.अनेक तांड्यावर घिसेवाड सांगत आहेत,जर बंजारा समाजाला कोणता ही पक्ष उमेदवारी देवो मी स्वतः त्या उमेदवाराचा प्रचार करतो.त्यामुळे बंजारा समाजामध्ये नागनाथ घिसेवाड यांच्या बाबत सहानुभूती निर्माण होत आहे. तसेच लवकरच १०० गाड्यांचा ताफा घेऊन नागनाथ घिसेवाड यांच्या नेतृत्वाखाली श्री क्षेत्र पोहरादेवी येथे दर्शनासाठी जाणार असल्याचे साई राठोड यांनी लोकभावना न्युजसी बोलताना सांगितले. त्यामुळे येणाऱ्या विधानसभेत विषेश म्हणजे भाजपच्या श्रीजया चव्हाण यांना जोरदार लढाई लढावी लागणार आहे.निवडणुक म्हणता तेवढी सोपी नाही गाव गाड्यांचा विचार केला तर एस्सी एसटी आणि ओबीसी हे निर्विवाद पणे नागनाथ घिसेवाड यांच्या पाठीशी खंबीरपणे राहणार असल्याचे सध्याचे वातावरण सांगते. घिसेवाड सध्या कोणत्याच पक्षात नसुन ते काँग्रेस पक्षाच्या काही लोकांच्या संपर्कात असल्याचे समजते. अगर महाविकास आघाडीचे उमेदवार जर घिसेवाड राहीले १०१ टक्के गुलाल लागलाच म्हणून समजा. तरी पण पक्षाचे तिकीट न भेटल्यास स्वतंत्र उभे राहणार असल्याचे समजते.त्यामुळे यावेळी त्यांच्या बद्दल सहानुभूती असल्याने अनेक पक्षातील कार्यकर्ते त्यांना मदत करणार असे दिसते.भाजप व अशोक चव्हाण यांच्या बद्दल अजुन ही लोकांत राग दिसुन येतो. याचाच फायदा घिसेवाड यांना मिळण्याची शक्यता आहे. सध्या एका कंपनीचा सर्व्हे चालू असून त्या मध्ये सर्वाधिक पसंती असल्याचे समजते.त्यामुळे मतदार संघात मोठ्या प्रमाणावर असलेल्या बंजारा समाजाचा कल बघतआअसएच म्हणावे लागेल तांड्या- तांड्यावर फुलतोय नागनाथ घिसेवाड यांचा राजकीय लळा,अब की बार घिसेवाड आमदार म्हणत तरुणांनी घेतला निवडुण आणण्याचा वसा……