गुरुद्वारा बोर्ड कर्मचाऱ्यानां या वर्षाचे इंक्रीमेंट लागू करने व 162 सेवादार टेक्निकल कर्मचाऱ्यांना अपग्रेडेशन वेतनश्रेणी लागू करणे अन्यथा आंदोलन करु- स.जर्नेल सिंघ गाडीवाले

abhishek bakkewad
4 Min Read
Spread the love

नांदेड जिल्हा प्रतिनिधी/

नांदेड – गुरुद्वारा बोर्ड कर्मचाऱ्यानां या वर्षाचे इंक्रीमेंट लागू करावे व 162 सेवादार टेक्निकल कर्मचाऱ्यांना लागू केलेले अपग्रेडेशन वेतनश्रेणी पुन्हा लागू करावी अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवाटी काँग्रेस पार्टीचे सिख समाज सेलचे राज्य प्रमुख तथा. गुरुद्वारा साहिब नांदेड प्रशासकीय समितीचे माजी सदस्य- स.जर्नेल सिंघ भुजंग सिंघ गाडीवाले यांनी गुरुद्वारा बोर्ड प्रशासनाला निवेदन सादर करुन विनंती केली आहे.

     या बाबत सविस्तर वृत्त नांदेड गुरुद्वारा सचखंड बोर्डाचे तत्कालिन प्रशासक साहिब यांनी गुरुद्वारा बोर्ड कर्मचाऱ्यांना सहावा वेतन आयोग लागू केला आहे.या अन्वये प्रति वर्ष जुलाई मध्ये बेसिकचे 3% इंक्रीमेंट देण्या सबंधी ठराव पारित केला आहे. हे इंक्रिमेंट लागू करण्याचे अधिकार अधीक्षक गुरुद्वारा बोर्डास दिलेले आहे. परंतु गुरुद्वारा बोर्डाच्या कर्मचाऱ्यांना प्रति वर्ष जुलै मध्ये हे इंक्रीमेंट लावले जात नहीं.महागाई सतत वाढत असल्यामुळे कर्मचाऱ्यांना खूप अडचणीना तोंड द्यावे लागत आहे. काहीं कर्मचारी जे 25-30 वर्षाहून जास्त सेवा देत सेवा निवृत्त झाले आहेत, त्यांना सदरील नुकसान सहन करावं लागत आहे. दरम्यान कोरोना महामारीच्या कार्यकाळात दर्शनाला येणारे यात्रेकरु येणे बंद झाले होते,गुरुद्वारा साहिब मध्ये कोणासही जाऊ देत नव्हते तेंव्हा गुरुद्वारा साहिबची आमदनी होत नव्हती. अशा भयावह कार्यकाळा मध्येही गुरुद्वारा बोर्ड कर्मचाऱ्यांचे पगार व इंक्रीमेंट रोकण्यात आले नव्हते मग आज घडीला गुरुद्वारा बोर्डाचे उत्पन्न चांगले होत आहे. यात्रेकरु सुध्दा खूप संख्येत येत आहेत. मग या कर्मचाऱ्यांवर हे अत्याचार का व कोणत्या कारणास्तव करण्यात येत आहेत हे अद्याप अस्पष्ट आहे.करिता स. जर्नेल सिंघ गाडीवाले यानी गुरुद्वारा सचखंड साहिबचे मा. प्रशासक साहिब यानां निवेदन देऊन विनंती केली असुन सदरील रोकलेले 3% इंक्रीमेंट माहे जुलाई 24 पासून लागू करणयात यावे.

      तत्कालिन प्रशासक साहिबानी गुरुद्वारा साहिब मध्ये 1300.00 रुपये ग्रेडपे वर जे सेवादार कर्मचारी टेक्नीशियन चे कार्य करित आहेत.ज्याप्रमाणे इलेक्ट्रिशियन, प्लंबर,बॉडी गार्ड, स्पेशल टास्क फोर्स, वाटर प्युरिफायर मशीन ऑपरेटर,आटा मशीन ऑपरेटर, इतर मशीन ऑपरेटर,धार्मिक पदावर कार्यरत ग्रंथी, लिखारी, सिफ्ट क्लर्क, ऑफिस क्लर्क, कंप्युटर क्लर्क, लांगरी, प्रशाद लांगरी आणि इतर टेक्निशियन इत्यादि यांना त्यांचे द्वारे केले जात असलेले कार्यास नजरे समोर ठेवून या एकूण 162 सेवादार कर्मचाऱ्यांना अपग्रेडेशन करुन त्यांना 1700.00 रुपये चा ग्रेडपे लागू करण्यात आले होते.या बाबत गुरुद्वाराचे अधीक्षक साहिब, यांनी या कर्मचाऱ्यांना अपग्रेडेशन चे पत्र सुध्दा दिले होते तसेच त्यांना अपग्रेडेशन अनुसार पगार सुध्दा देण्यात आला आहे.परंतु कोणतेही ठराव नसतानां किंवा कोणाचे ही लेखी स्वरूपाचे पत्र नसतांना

    कर्मचाऱ्यांचे अपग्रेडेशन अनुसार देत असलेली पगार रोकण्यात आली. जे आजपर्यंत लागू करण्यात आले नाहीं.अशा प्रकारे त्यांचावर अन्याय करण्यात येत आहे. स.जर्नेल सिंघ गाडीवाले यानी गुरुद्वारा सचखंड साहिबचे मा.प्रशासक साहिब यानां निवेदन देऊन विनंती केली की तत्कालिन प्रशासक गुरुद्वारा सचखंड साहिब, नांदेड यांचे द्वारे पारित ठराव अनुसार या कर्मचाऱ्यांना ग्रेडपे लागू करुन वेतनश्रेणी देण्यात यावे.

    आजपर्यंचा बोर्डाचा कार्यकाळ बघता असे समोर आले की, काहीं विशेष कर्मचाऱ्यांना ज्येष्टता यादि डावलून पदोन्नती दिली आहे. हा पायंडा प्रशासक साहेब पुढे चालवणार नाहीं अशी अपेक्षा आहे.

गाडीवाले यानी गुरुद्वारा प्रशासनास असे ही ताकीद दिली की जर या मागण्या त्वरित मान्य करण्यात आली नाहीं तर गुरुद्वारा गेट क्रमांक. 01 वर जनआंदोलन करण्यात येईल, यासाठी गुरुद्वारा बोर्ड प्रशासन जबाबदार असेल. याची नोंद घेण्यात यावी.असा आंदोलनात्मक ईशारा स.जर्नल सिंघ भुजंग सिंघ गाडीवाले यांनी दिला आहे.

Share This Article
error: Content is protected !!