भोकर ता.प्रतिनिधी/माली पाटील
भोकर -जय जयाजी गणपती | मज द्यावी विपुल मती | करावया तुमची स्तुती | स्फूर्ती द्यावी मज अपार || तुझे नाम मंगलमूर्ती | तुझं इंद्र-चंद्र ध्याती | विष्णु शंकर तुझं पूजिती| अव्यया ध्याती नित्य काळी || तुझे नाव विनायक | गजवदना तू मंगलदायक | सकल नाम कलीमलदहाक | नाम-स्मरणे भस्म होती || मंगलमूर्ती मोरयाचा जयघोष करीत लाखो भाविक गर्दी केली. यामुळे पाळज येथे रविवार ठरला गणेश भक्तांचा अलोट गर्दीचा उच्चांक कारण लाखांच्या वर भाविक श्रीं चे पदस्पर्शन केले आहे.
पाळजच्या गणपतीची महीमाच न्यारी अन् भक्त गणासाठी सोय पण भारी अशा उत्साहात महाराष्ट्र, तेलंगणा व आंध्रप्रदेश मधुन भाविक येऊन पाळज येथे नवसाला पावणार्या गणरायाच्या दर्शनासाठी दररोज गर्दी करत असताना दिसत आहे.येथे येणाऱ्या भक्तांची विषेश काळजी गावकरी व गणेश मंडळांच्या वतीने करण्यात येते. येथे दर्शनासाठी येणाऱ्या भक्तांसाठी प्रसादाची सोय केली जाते.दररोज जवळपास ५० ते ६० क्विंटल तांदुळ सिजवल्या जाते.यावरुनच येथे येणाऱ्या गणरायाच्या भक्तांची संख्या दिसुन येते.सर्व सामान्य भक्तांसाठी रांगेत दर्शन मिळते तर दोनशे रुपये भरून विषेश दर्शनाची सोय आहे. दि.१५ रोज रविवार असल्याने येथे दर्शनासाठी लाखांच्या वर भाविक दर्शनासाठी गर्दी केली.तर दि.१६ रोज सोमवार सुट्टी असल्यामुळे आज ही मोठी गर्दी होण्याची शक्यता आहे. खरच या गणरायाच्या अकरा दिवस चालणाऱ्या उत्सवात लाखो भाविकांचे पाय पाळज गावात पडणे म्हणजे भाग्याचे लक्षण असते.धन्य झाले ते पाळज वासी. गणपती बाप्पा मोरया!