खून,गँगरेपचा प्रयत्न व फाशी अशा तीन वेगवेगळ्या घटनेने धर्माबाद तालुका हादरला!

abhishek bakkewad
4 Min Read
Spread the love

खून,गँगरेपचा प्रयत्न व फाशी अशा तीन वेगवेगळ्या घटनेने धर्माबाद तालुका हादरला!

खूनाचा तपास लावला एकाच दिवसात

वेगवेगळ्या संघटनांच्या महिला पदाधिकाऱ्यांची ठाण्यात भेट!

नांदेड जिल्हा प्रतिनिधी:संजीवकुमार गायकवाड

 

नांदेड – जिल्यातील धर्माबाद- गणेश विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर धर्माबाद शहरात खून,गॅंग रेपचा प्रयत्न व फाशी अशा तीन वेगवेगळ्या घटना घडल्यामुळे अख्खा धर्माबाद तालुका हादरला असून धर्माबाद पोलीस ठाण्याचे नूतन पोलीस निरीक्षक रावसाहेब रोकडे यांनी खुनाचा तपास एकाच दिवसांमध्ये लावल्यामुळे त्यांच्यावर कौतुकाचा पाऊस पडत असून गॅंग रेपचा प्रयत्न झालेल्या व विनयभंगाचा गुन्हा दाखल झालेल्या प्रकरणात ते अतिशय कसून तपास घेत असून कायदा व सुव्यवस्था बिघडणार नाही यासाठी सर्वांनी सहकार्य करण्याची विनंती त्यांनी केली.

तालुक्यातील करखेली येथील 31 वर्षीय तरुण सय्यद वसीम अली हा आपल्या धर्मपत्नीस धर्माबादला जातो म्हणून सांगून 16 सप्टेंबर रोजी गेला तो त्या दिवसापासून बेपत्ता होता. त्याच्या वडिलांनी धर्माबाद पोलीस ठाण्यात हरवल्याची तक्रार दिली होती.धर्माबाद पोलिसांनी अवघ्या एकाच दिवसात या प्रकरणाचा छडा लावला.सय्यद वासिम अली याचे प्रेत सिरसखोड येथील गोदावरी नदीच्या किनारी असलेल्या जुन्या मजिदच्या पाठीमागे पाण्याच्या डबक्यात मिळून आले.त्याच्या डोक्यावर,कपाळावर व शरीरावर जखमा आढळून आल्या व आरोपीने पुरावा नष्ट करण्यासाठी त्या तरुणाचे प्रेत पाण्यात नेऊन टाकले.

त्या अनुषंगाने धर्माबाद पोलिसांनी वेगाने चक्र फिरवली. आरोपी हा मयताचा चुलत भाऊ सय्यद फसींअली सय्यद गौस अली वय वर्ष 23 व्यवसाय मजुरी राहणार करखेली याने खून केल्याचे कबूल केल्यावर उघड झाली असून अनैतिक संबंधातून हा खून झाल्याचे निष्पन्न होत आहे.

 

गॅंग रेपच्या प्रयत्नाची घटना ही शहरातील रामनगर भागात घडली असून त्या परिसरातील एका महिलेला तीन आरोपींनी घरातून मुस्क्या बांधून पळून नेऊन परत अर्ध्या तासाच्या आत तिला घराच्या जवळ फेकून दिले तेव्हा ती बेशुद्ध अवस्थेत व कपडे फाडलेल्या अवस्थेत आढळून आली. यावरून तिच्यावर गॅंग रेप झाला की काय असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात असून या घटनेने धर्माबाद शहर हादरले होते.

 

पण अजूनही सदरील महिलेचा कुठलाही जवाब त्या दिशेने आला नसला तरी त्या महिलेचे मेडिकल करण्यात आले असून आरोपीवर विनयभंगाचा गुन्हा तूर्तास दाखल करण्यात आला आहे.व तीन संशयित आरोपी ताब्यात घेण्यात आले आहे.

तिसरी घटना ही फाशी घेण्याची घडली असून येथील हुतात्मा पानसरे हायस्कूल मधील विद्यार्थी प्रिय शिक्षक दिगंबर धोंडीबा जाधव वय वर्ष 53 राहणार इस्लापूर तालुका किनवट हल्ली मुक्काम गुजराती कॉलनी यांनी आपली एकुलती एक मुलगी देवश्री हिच्या बीडीएस या वैद्यकीय शिक्षणाची फिस भरण्याच्या चिंतेने व कोणत्याही बँकेकडून कर्ज न मिळाल्याने व इतर कर्जाचे टेन्शन असल्यामुळे आपल्या राहत्या घरात सिलिंग फॅनला दोरीने गळफास लावून आत्महत्या केली असून तशा प्रकारची फिर्याद त्यांची पत्नी महानंदा दिगंबर जाधव यांनी धर्माबाद पोलीस ठाण्यात दिली आहे.फाशी घेतलेले मयत शिक्षक दिगंबर धोंडीबा जाधव हे विद्यार्थ्यांमध्ये व शहरांमध्ये एक चांगले व्यक्तिमत्व असल्यामुळे त्यांच्या मृत्यूमुळे धर्माबाद शहरात खळबळ उडाली आहे.

 

जे प्रकरण गँगरेपच्या प्रयत्नाचं झालेलं आहे पण अद्याप सिद्ध झालेले नाही व विनयभंगाचा गुन्हा दाखल झालेला आहे हे प्रकरण सध्याला धर्माबाद शहरासह अख्या नांदेड जिल्ह्यात चर्चेचा विषय बनला असून त्या पार्श्वभूमीवर विविध पक्षांचे,संघटनेचे महिला पदाधिकारी धर्माबाद पोलीस ठाण्यात भेट देत असून त्यांच्या सोबतच मुस्लिम व हिंदू धर्मीयांचे पुरुष व स्त्रिया मोठ्या संख्येने येत आहेत.

 

आज महाराष्ट्र महिला काँग्रेसच्या उपाध्यक्ष सौ.रेखा पाटील चव्हाण,जिजाऊ ब्रिगेडच्या तालुका अध्यक्षा सौ.सावित्रा जाधव,महिला जिल्हा काँग्रेसच्या कार्याध्यक्षा जयसिका शिंदे,नांदेड दक्षिणच्या महिला काँग्रेस अध्यक्षा नसीम पठाण व धर्माबादच्या शहराध्यक्ष सुलताना बेगम सय्यद तद्वतच सामाजिक कार्यकर्त्या रफिया बेगम मा.नगरसेविका नीता गायकवाड या धर्माबाद पोलीस ठाण्यात येऊन आरोपींना कठोरात कठोर शिक्षा व्हावी त्या घटनेच्या अनुषंगाने सर्व कलमानुसार गुन्हे दाखल कराव्यात अशी मागणी त्यांनी एका लेखी निवेदनाद्वारे केली असून यावेळी पोलीस ठाण्यात एकच गर्दी उसळली होती.

Share This Article
error: Content is protected !!