श्री कपिलमुनी गणेश मंडळाच्यावतीने स्पर्धकांना प्रमाणपत्राचे वाटप

abhishek bakkewad
2 Min Read
Spread the love

रांगोळीतून ‘बेटी बचाओ,बेटी पढाओ’ हा स्त्री समानतेचा सामाजिक संदेश

माहूर तालुका प्रतिनिधी/विजयसिंह हजारी

दि.१९ सप्टेंबर- अनेक वर्षाची धार्मिक उत्सव परंपरा लाभलेल्या श्री कपिलमुनी गणेश मंडळ, कपिलेश्वर मंदिर वार्ड क्र. ०१ च्यावतीने सोमवार दि.१५ व १६ सप्टेंबर रोजी महिला व लहान मुलामुलींसाठी रांगोळी, संगीत खूर्ची व लिंबू-चमचा या कला व खेळ स्पर्धा घेण्यात आल्या. त्यामध्ये एकूण ३३ स्पर्धकांनी आपला सहभाग नोंदविला.त्यातील उत्कृष्ट १० यशस्वी स्पर्धकांना मंडळातर्फे प्रमाणपत्राचे सत्कारपूर्वक वाटप अध्यक्ष विजयसिंह हजारी यांच्या हस्ते मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले.

    उत्कृष्ट सजावट,मनमोहक देखावा,समाजप्रबोधनात्मक चित्तवेधक असे लिहिलेले संदेश,आकर्षक आधुनिक लायटींग व्यवस्था,देशभक्तीपर संदेशाच्या सुंदर रांगोळी,दररोज धार्मिक व मनोरंजनात्मक कार्यक्रम,

   क्रिडास्पर्धा,वास्तव मांडणारे देशभक्तीपर चित्रपट असे धार्मिकतेतून समाजात विविध सामाजिक सलोखा व एकोपा वाढीस लावणारे कार्यक्रम आयोजित करण्यात अग्रेसर असलेले शहरातील श्री कपिलमुनी गणेश मंडळ याहीवर्षी समाजप्रबोधनाचे ज्वलंत व वास्तव विषय घेऊन गणेश उत्सवाच्या माध्यमातून आपली सामाजिक बांधिलकी जोपासताना दिसून आले

    ‘झाडे लावा, झाडे जगवा’, ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’ यासह विविध प्रकारचे लक्षवेधी सामाजिक संदेश देणाऱ्या आकर्षक व उत्कृष्ट रांगोळी ह्या या स्पर्धेतील विशेष आकर्षणाचा केंद्र बिंदू ठरल्या.मंडळाच्या वतीने दि. १५ व १६ सप्टेंबर या दरम्यान महिला व लहान मुलामुलींसाठी उत्कृष्ट रांगोळी,संगीत खुर्ची, लिंबू-चमचा आदी स्पर्धा घेण्यात आल्या. ज्यामध्ये शहरातील एकूण ३३ स्पर्धकांनी आपला उत्स्फूर्त प्रतिसाद नोंदविला. त्यापैकी उत्कृष्ट अशा १० स्पर्धकांची निवड श्री कपिलमुनी गणेश मंडळाच्यावतीने करण्यात आली. त्यात रांगोळी स्पर्धेतील संयुक्त विजेत्यांसह केतकी पराते, रानी राठोड,रेणुश्री दुबे,शरयू दुबे,ललिता मेहता,भारती भट, 

    सलोनी जोशी, भक्ती शेवाळे, रेणुका माळवे,स्वरा जगताप, निशांत पवार, अनिकेत राणे, प्रेम शेवाळे या यशस्वीतांना मंडळाच्या वतीने प्रमाणपत्रे वितरित करण्यात आले. यावेळी मंडळाचे अध्यक्ष विजयसिंह हजारी,उपाध्यक्ष आशुतोष कुमरे,सचिव नकुल पस्पुलवार,कोषाध्यक्ष भावेश शेवाळे सह सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

TAGGED:
Share This Article
error: Content is protected !!