नांदेड जिल्हा प्रतिनिधी:संजीवकुमार गायकवाड
नांदेड – दि.२०.जिल्यातील धर्माबाद शहरातून दोन्ही बाजूने जाणाऱ्या राज्य रस्त्यावरील शहरातील अंतर्गत रस्त्याच्या रोड मॅचिंगचे काम हे वर्ष झाले तरी अखेर कोणाचे हे कोडे धर्माबाद यांना उलगडनासे झाले असून शहरांमधून अंतर्गत रस्त्यावरून प्रमुख राज्य रस्त्यावर येताना अपघाताच्या घटना घडत आहेत.
बासर तीर्थक्षेत्राकडून येणारा तेलंगाना राज्य सीमेपासून डी वाय एस पी कार्यालय,तेलंगाना बस स्थानक,मुस्लिम स्मशानभूमी,रामनगर चौरस्ता, शिवटेकडी,शास्त्री महाविद्यालय,ते थेट महावीर चौक, फुले नगर,छत्रपती शिवाजी चौक,रेल्वे डेट क्रमांक दोन ते बाभळी फाटा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकाकडे जाणारा प्रमुख राज्य रस्ता आहे. तो के.टी.कन्स्ट्रक्शनने बांधला असून शहरातून जाणाऱ्या या प्रमुख राज्य रस्त्याला अनेक अंतर्गत रस्ते आहेत.जे मुख्य राज्य रस्त्याची उंची जास्त झाल्यामुळे हे रस्ते त्या रस्त्याला मॅचिंग होत नाहीत. त्यामुळे सदरील रस्त्यावरून मुख्य राज्य रस्त्यावर येताना अपघाताचा धोका वारंवार संभावत आहे.
त्याचप्रमाणे जन्मभूमी ते कर्मभूमी हा राज्य रस्ता रेल्वे गेट क्रमांक दोन, 33 के.व्ही. उपकेंद्र,रत्नाळी मार्गे शंकरगंज,महाराष्ट्र बस स्टॅन्ड,ते टी पॉइंट पर्यंतचा रस्ता मोरगे कन्स्ट्रक्शनचा आहे.त्या रस्त्यावर सुद्धा अनेक शहरांतर्गत रस्ते जे सदरील रस्त्याला अद्याप मॅच झालेले नाहीत.
उपरोक्त पार्श्वभूमीवर प्रस्तुत प्रतिनिधीने संबंधित गुत्तेदाराला बोलले असता ते आमचे कामच नाही, आमच्या इस्टिमेट मध्ये नाही अशी उडवा उडवीची उत्तरे मिळत आहेत.म्हणून प्रस्तुत प्रतिनिधीने नगरपालिकेचे मुख्याधिकारी सतीश पुदाके यांच्याशी चर्चा केली असता संबंधित गुत्तेदाराविरुद्ध आपण नोटीसा बजावून अंतर्गत रस्ते ते मुख्य राज्य रस्त्यात मॅचिंगचे काम करायला भाग पाडू असे आश्वासन दिले असले तरी सदरील काम हे गुत्तेदाराचे आहे की नगरपालिका प्रशासनाचे याबाबत समाधानकारक उत्तर मिळू शकले नाही.
शहराच्या दोन्ही बाजूने जाणाऱ्या मुख्य राज्य रस्त्याच्या बाजूने शहरांतर्गत जवळपास 20 ते 25 रस्ते असून सर्व रस्त्याची अवस्था जवळपास सारखीच आहे.