सोमवारी किसान जनआंदोलनाचा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा

abhishek bakkewad
2 Min Read
Spread the love

शेतकऱ्यांच्या हक्कासाठी लाखोच्या संख्येने धडक मोर्चात सहभागी होण्याचे सचिन कासलीवाल यांचे शेतकऱ्यांना आवाहन

नांदेड जिल्हा प्रतिनिधी:संजीवकुमार गायकवाड

     नांदेड -किसान जन आंदोलन भारत चे संस्थापक सचिन कासलीवाल यांच्या पुढाकारातून सोमवार दि.२३ सप्टेबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालय नांदेडवर शेतकरी धडक मोर्च्याचे आयोजन कॉ. डॉ. अण्णा भाऊ साठे चौकापासून ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत दु. १२.०० वाजता करण्यात आले आहे तरी शेतकऱ्यांच्या हक्कासाठी लाखोच्या संख्येने धडक मोर्चात सहभागी होण्याचे आवाहन किसान जन आंदोलन भारत चे संस्थापक सचिन कासलीवाल यांच्या वतीने करण्यात आले आहे.

     या धडक मोर्चाव्दारे शेतकरी राजा जागा हो,संघर्षाचा धागा हो अशी लक्षवेधी घोषणा देत शेतकऱ्यांच्या विविध मागण्या प्रशासनासमोर मांडण्यात येणार असून यात पिक संरक्षण कायदा करण्यात यावा.शेतकरी व पिकाच्या संरक्षणासाठी वन्यप्राण्यांचा बंदोबस्त करणे, शेतकऱ्यांना शेत जमिनीच्या मुल्यांकनाच्या किमान ५०% पिक कर्ज द्या. पिक कर्ज परतफेडीचा कालावधी १० वर्ष करणे तसेच आधारभूत किंमतीवरील सोयाबीन खरेदी केंद्र तातडीने कार्यान्वित करणे व कापूस खरेदी करीता ते १ आक्टोबर २०२४ पुर्वी सुरु करा आणि पंतप्रधान पिक विमा योजनेचा क्लेम मंजूर झाला तर क्लेम रक्कम त्याच हंगामात द्या , शेतकऱ्यांना झिरो बॅलन्स वर बचत खाते काढण्याचा शेतकऱ्यांना अधिकार द्या.

      यासह शेतकऱ्यांचे बचत खाते होल्ड करु नका,ऊस लागवड व तोडणी प्रोग्राम ऑनलाइन करून उस कारखान्याची दादागिरी संपवा व फळे-भाजीपाला बाजारातील एकसारख्या गुणवत्तेच्या मालाचा भाव फरक,वजन वजावट,कमीशन इ.रद्द करा आणि शेतमाल विक्री नंतर पैसे (पट्टी) त्याच दिवशी द्या.व पेस्टीसाइड व केमिकल मधील ५००% पर्यंतची नफाखोरी संपवा अशा अनेक शेतकरी हिताच्या मागण्यासह हा मोर्चा लाखोच्या संख्येने जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार आहे.

      तरी या मोर्चात शेतकऱ्यांनी लाखोच्या संख्येने सहभाग नोंदवून आपला आक्रोश व्यक्त करावा असे आवाहन आयोजक किसान जन आंदोलन चे संस्थापक सचिन कासलीवाल यांनी केले आहे.

Share This Article
error: Content is protected !!