बोरगडी येथे आजपासून अखंड हरिनाम सप्ताह मोठ्या उत्साहत सुरुवात…

abhishek bakkewad
1 Min Read
Spread the love

प्रतिनिधी /लक्ष्मण भैरेवाड

हिमायतनगर श्रीक्षेत्र बोरगडी येथे हभप माधवराव महाराज बोरगडीकर यांच्या मार्गदर्शनाखाली वै. साहेबराव (कृष्णा) यांच्या पुण्यस्मरणार्थ २२ सप्टेंबरपासून अखंड हरिनाम सप्ताहासह सुरुवात होणार असून २९ रोजी सांगता होणार आहे.

सप्ताहात दररोज पहाटे काकडा, सकाळी ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण, सायंकाळी हरिपाठ, रात्री हरि किर्तन होणार आहे. ह्या सप्ताहास तीस वर्षांची परंपरा आहे. आणि हा धार्मिक कार्यक्रम दरवर्षी मोठ्या उत्साहामध्ये साजरा केला जातो आणि या धार्मिक कार्याचे वैशिष्ट्ये असे की बोरगडी परिसरातील भावी भक्त हे आवर्जून या कार्यक्रमाला उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवत असतात आणि या अखंड हरिनाम सप्ताह च्या निमित्ताने बोरगडी परिसरातील भाविक भक्त दरवर्षी सप्ताहाचा आनंद घेत असतात त्यामुळे बोरगडी येथे २२ सप्टेंबर रोजी हभप लक्ष्मण महाराज शेनेवाड बोरगडीकर यांचे कीर्तन होणार आहे.

           २३ रोजी लक्ष्मण महाराज धानोरा ज., २४ रोजी डॉ. लक्ष्मण रावते, २५ रोजी संतोष महाराज पंढरपूर, २६ रोजी पंजाबराव चालगणीकर महाराज, २७ रोज भिमराव महाराज फुटाणकर, २८ रोजी निळोबा महाराज हरबळकर २९ रोजी सकाळी ८ ते १० रोज निळोबा महाराज हरबळकर यांचे काल्याचे कीर्तन होणार आहे. यावेळी पिंपळगाव येथील बालयोग व्यंकटस्वामी महाराज यांच उपस्थीती राहणार आहे. भाविकानी सप्ताहात सहभागी व्हावे, असे आवाहन संयोजक माधवराव महाराज बोरगडीकर यांनी केले.

Share This Article
error: Content is protected !!