गोल्ला गोलेवार यादव समाज भूषण पुरस्काराचे यंदाचे मानकरी; सद्गुरु श्री साईनाथ महाराज वसमतकर, श्री दिगांबरराव करेवाड व श्री दगडूजी काईतवाड 

abhishek bakkewad
2 Min Read
Spread the love

 

संपादक/ अभिषेक बकेवाड 

नांदेड – गोल्ला गोलेवार यादव महासंघ व जय श्रीकृष्ण जय देवदत्त बचत समितीची संयुक्त बैठक पत्रकार कॉलोनी नांदेड येथे प्रदेश अध्यक्ष श्री भुमन्ना आक्केमवाड भोसीकर यांचे अध्यक्षतेखाली संपन्न झाली.

या बैठकीत दिड हजार भक्तांसोबत वाघा बॉर्डरवर सात दिवस स्वच्छता अभियान राबवणारे व तसेच शिवनेरी ते रायगड पदयात्रा काढून स्वच्छतेचा संदेश देणारे राष्ट्रसंत सद्गुरु श्री साईनाथ महाराज वसमतकर यांना विशेष समाज भूषण पुरस्कार जाहिर करण्यात आला. व तसेच दरवर्षी देण्यात येणारा गोल्ला गोलेवार यादव समाज भूषण पुरस्कार ज्येष्ठ समाज सेवक श्री दिगांबरराव बाबाराव करेवाड कोल्हारीकर व ज्येष्ठ समाज सेवक श्री दगडूजी काईतवाड बोरगडीकर यांना सर्वानुमते मंजूर करण्यात आला.

या पुरस्काराचा वितरण सोहळा विजयादशमीच्या पूर्वसंध्येला शुक्रवार दि. ११ ऑक्टोबर २०२४ रोजी सद्गुरु श्री साईनाथ महाराज वसमतकर 

यांचे आश्रम श्रीक्षेत्र माहूरगड येथे संपन्न होणार आहे.

सदरील कार्यक्रमात समाजाच्या वतीने दर वर्षी घेण्यात येणारा सन २०२३-२४ गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारोह आयोजित केला आहे. यामध्ये ५वी, ८वी शिष्यवृत्ती, दहावी, बारावी, आयटीआय पात्र एमबीबीएस, एमडी- एमएस, व तसेच एमपीएससी, यूपीएससी, नेट-सेट पात्र विद्यार्थ्यांचा समावेश राहील.

या कार्यक्रमाच्या शेवटी व्यसन मुक्तीसाठी व्यसन रुपी रावणाच्या पुतळ्याचे दहन करून व्यसन मुक्तीचा संदेश देण्यात येणार आहे.

सदरील बैठकीस प्रांत अध्यक्ष भुमन्ना आक्केमवाड भोसीकर, बचत समितीचे अध्यक्ष श्री पी. पी. फांजेवाड, जि. सचिव श्री अशोक कासराळीकर, अर्धापूर ता. अध्यक्ष श्री गंगाधरराव बकेवाड, श्री परशुराम आक्कमवाड, जि. कोषाध्यक्ष श्री तुकाराम कैलवाड, श्री अंबादासजी आटपलवाड श्री माधवराव वटपलवाड, मुदखेड ता. अध्यक्ष श्री रामजी गवंडेवाड, श्री सायलुजी करेवाड, श्री बालाजीराव शेनेवाड, श्री प्रकाशराव नेरलेवाड, श्री हणमंतराव काऊलवार, श्री राजेंद्र भुसलवाड, श्री शिवराम आनेमवाड, बँक मॅनेजर श्री जगदिश आक्कमवाड, श्री विठ्ठलराव येशमवार, श्री योगेश मंत्री आदी उपस्थित होते.

Share This Article
error: Content is protected !!