पडत्या काळात पक्षाला सोडून पळनाऱ्यांचे आम्ही काम का करावे;कार्यकर्त्याचा सवाल
नांदेड जिल्हा प्रतिनिधी:संजीवकुमार गायकवाड
नांदेड – माजी मंत्री भास्करराव खतगावकर हे गुरुवारी काँग्रेस पक्षात प्रवेश केले शनिवारी दिनांक २१ सप्टेंबर रोजी त्यांचे आगमन होताच राजकीय शक्ती प्रदर्शन करण्याच्या उद्देशाने प्रमुख मार्गावर बॅनर लावण्यात आले पण प्रत्यक्षात त्यांच्या स्वागतासाठी कोणताही जुना काँग्रेस चा खमक्या पुढारी सरसावला नाही किंवा कार्यकर्त्यांनी अपेक्षे सारखा प्रतिसाद दिला नाही त्यामुळे त्यांनी काँग्रेस प्रवेश करून घेतलेला निर्णय सार्थकी ठरेल किंवा नाही हा सस्पेन्स कायम राहिला आहे.
श्रावण महिन्यातील सोमवारी त्यांचे कुलदैवत असलेल्या धर्माबाद तालुक्यांतील श्रीक्षेत्र संगम येथील भंडारा कार्यक्रमातून त्यांनी नायगाव मतदार संघातून डॉ मीनल पाटिल निवडणुक लढवतील असे जाहीर केले त्या कार्यक्रमास उपस्थीत असलेल्या अनेक पदाधिकारी कार्यकर्ते त्यांच्या काँग्रेस प्रवेश आगमन निम्मित स्वागताकडे मात्र गेले नसल्याने खतगावकर यांनी घेतलेला निर्णय कार्यकर्त्यांना पटला नाही असा तर होत नाही का? असे सदरची परिस्थीती पाहून दिसून येते.
धर्माबाद हा तालुका काँग्रेसची विचारधारा जोपासणारा तालुका म्हणून ओळखला जातो.स्व.शंकरराव चव्हाण यांच्या पासून ते स्व.वसंतराव चव्हाण यांच्या पर्यंतच्या अनेक नेत्यांना मोठे मताधिक्य मिळवून देण्यात स्थानीक कार्यकर्ता व पदाधिकारी यांचे योगदान राहिले आहे.
आज ही काँगेस पक्षाला मानणारा मोठा वर्ग आणि मतदार कायम आहे पण खतगावकर यांनी पूर्वी पण कोणत्याही कार्यकर्त्यांना विश्वासात घेतले नव्हते आणि आता देखील सर्वसामान्य कार्यकर्त्यांना महत्व देत नाहीत त्यामुळे त्यांच्या नव्या राजकीय इनिंग च्या सुरूवातीलाच कार्यकर्त्यांनी दुर्लक्ष करून तुम्ही घेतलेला निर्णय कार्यकर्त्यांना पटला नाही असे सूचक संदेश त्यातून दिले असल्याचे जाणवत आहे.
तालुक्यात पक्षाच्या पडत्या काळात अनेक कार्यकर्त्यांनी जीवाचे रान करून पक्ष टिकवला आणि व्होट बँक सेफ ठेवली पक्षाला पुन्हा चांगली उभारी दिली त्यामुळे दलबदलू नेत्यांना संधी साधण्यासाठी कार्यकर्त्यांच्या परिश्रमाचा वापर करू नये,काँगेस पक्षात राहून सर्व पदे उपभोगाची आणि पक्षाला वाईट दिवस येताच दुसरीकडे पाळायचे पुन्हा पक्षा लां उभारी मिळताच प्रवेश करून कारभारी व्हायचं ही प्रथा आता बंद झाली पाहिजे अशी एकमुखी भूमिका अनेक जुन्या जाणकार काँग्रेस विचारधारा जोपासणाऱ्या मंडळींनी नाव न छापण्याच्या अटीवर बोलून दाखवली आहे.
स्व.खासदार वसंतराव चव्हाण यांच्या निधनाने जी की पोकळी निर्माण झाली आहे ती भरून काढण्यासाठी सर्व कार्यकर्ते व पदाधिकारी प्रा.रवींद्र पाटील चव्हाण यांच्या पाठीशी ठाम आहेत.ते नांदेड लोकसभा पोट निवडणुकीत उभे टाकतील की नायगांव विधानसभा मतदार संघात उभे राहतील हे अद्याप तरी स्पष्ट दिसत नाही पण त्यांना मात्र पक्षाच्या कार्यकर्त्यांनी,पदाधिकाऱ्यांची सहानुभूती आणि जनतेची भक्कम साथ मिळेल असे चित्र सद्या तरी स्पष्ट दिसत आहे.