संयोजक विशाल पवार यांनी मानले सर्वाचे आभार
देगलुर/प्रतिनीधी ,नागेश पलपवार,
गोर बंजारा समाजातील महिलाचा सर्वात मोठा सण/उत्सव म्हणजे तीज मानला जातो. या उत्सवामध्ये एका छोट्या टोपली मध्ये धान उगवले जाते आणि त्या धान चे सलग आठ दिवस पुजा केली जाते व नवव्या दिवशी त्याचे पाण्यात विसर्जन केले जाते. धान म्हणजे बंजारा समाजाची देवी अशी धारणा समाजाची आसते.
देगलूर येथील सद्गुरु सेवालाल महाराज चौक पासून ते विसर्जन घाट पर्यंत ही शोभा यात्रा म्हणजेच महोत्सव साजरा करण्यात आला असून या महोत्सवामध्ये बंजारा पारंपारिक लोकनृत्य ,बंजारा पारंपारिक लेंगी , बंजारा हलगी (डपडा), बंजारा पारंपारिक संगीत यांच्यासह इत्यादी पारंपारिक लोक कले सह कुमरिकेच्या डोक्यावर तिज ची टोपली घेऊन वाजत ,गाजत,नाचत ही शोभायात्रा हजारो समाज बांधवांच्या उपस्थीत पार पडली.
यावेळी माजी समाज कल्याण सभापती रामराव नाईक, बंजारा क्रांती दलाचे अध्यक्ष देविदास राठोड, माजी नगराध्यक्ष मोगलाजी शिरशेटवार , माजी सनदी अधिकारी शिवाजी पवार, माजी सनदी अधिकारी वरवंटकर, माजी अप्पर बी एम कांबळे, पांडुरंग पवार अँड मोहाने मॅडम , भावना दाशेटवार,आजी माजी नगसेवक , विविध संघटनेचे पदाधिकारी विशेष म्हणजे जिजाऊ ब्रिगेड तसेच वेगवेगळ्या तांड्यातील नायक-कारभारी आदी अनेक मान्यवरांच्या उस्थितीत हा कार्यक्रम पडला. देगलूर शहरातील जे बंजारा समाजाचं वैभव (चौक)उभ आहे त्यामधे माजी नगराध्यक्ष मोगलाजी शिरशेटवार यांचे खुप मोठे योगदान आहे असे संयोजक विशाल पवार पत्रकारांशी बोलताना म्हणाले.
या शोभा यात्रे दरम्यान सुशीलकुमार देगलूरकर यांनी फळ वाटप केले. तसेच माजी नगराध्यक्ष मोगलाजी अण्णा शिरशेटवार मित्र मंडळाच्या वतीने विसर्जन घाट येथे जेवण ठेवण्यात आले होते.तसेच नदीच्या पाण्यात तिज विसर्जन करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
या कार्यक्रमासाठी संदीप चव्हाण,सचिन जाधव, अनिल राठोड, बालाजी जाधव, कपिल, गणेश,राजु, सचिन यांच्यासह अनेक गोर युवकांनी अहोरात्र मेहनत घेऊन हा कार्यक्रम यशस्वी केला त्याबद्दल संयोजकांच्या वतीने सर्व टीम आभार मानण्यात आले. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन राज पवार, डॉ सुनील जाधव यांनी केले तर तिज चे महत्त्व विजय जाधव , प्रस्ताविक संयोजक विशाल पवार तर आभार तानाजी चव्हाण यांनी मांडले.