भोकर येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक नियोजीत पुतळ्याच्या जागेवरील अतिक्रमण प्रशासनाने हटविले आंबेडकरी अनुयायांनी प्रशासनाचे मानले आभार

abhishek bakkewad
2 Min Read
Spread the love

नांदेड जिल्हा प्रतिनिधी:संजीवकुमार गायकवाड

नांदेड – भोकर शहराच्या मध्यभागी असलेल्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या नियोजीत पुतळ्याच्या जागेवरील अतिक्रमणाचा तिढा तब्बल चाळीस वर्षानंतर मा.न्यायालयाच्या निर्णयानंतर सुटला असून अखेर आज (दि.21 सप्टेंबर) सकाळी नगर पालिका प्रशासनाने बुलडोझर लावून अतिक्रमीत जागा मोकळी केली आहे.

 तालुक्यातील सबंध आंबेडकरी अनुयायांनी या निर्णयाचे स्वागत करत फटाके फोडून पेढे वाटून आनंदोत्सव साजरा करतांना प्रशासनाचे जाहीर आभार मानले .

डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या नियोजीत पुतळ्याच्या जागेवरील आतिक्रमन काढून या जागी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळा उभारून या जागेचे सौंदर्यीकरण करण्यात यावे यासाठी मागील ४० वर्षापासून समाजबांधवांच्या वतीने संघर्ष संघर्ष सूरू होता.या साठी विवध संघटना व राजकीय पक्षांकडून आंदोलने,मोर्चे, उपोषणे,कऱण्यात आले. 

अतिक्रमणधारकांचे सदर प्रकरण न्यायप्रविष्ट असल्यामुळे ही मागणी प्रलंबित होती.दरम्यान मा.उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबाद यांचेकडील रिटी पिटीशन के. 9104/2021, 91/05/2021 दिनांक 24/07/2024 या प्रकरणातील मा. विभागीय आयुक्त छत्रपती संभाजीनगर यांचे निर्णयावरून. तालुका प्रशासनानेआज सकाळी ०६ वाजता बुलडोझर लावून जागा मोकळी केली आहे..

प्रशासनाने घेतलेल्या या निर्णयाचे तालुक्यातील सबंध आंबेडकरी अनुयायी व बौद्ध बांधवांकडून स्वागत करण्यात आले आहे.. सोबतच मागील ४० वर्षापासून विविध पक्षात व सामाजिक संघटनेत काम करणाऱ्या अनेक आंबेडकरी नेत्यांनी या जागेसाठी संघर्ष केला आहे. त्यांच्यात संघर्षामुळे खऱ्या अर्थाने न्याय मिळाल्याच्या भावना समाज बांधवात व्यक्त होत आहेत. या सामाजिक कार्यात तन-मन धनाने योगदान देणाऱ्या सर्व चळवळीतील कार्यकर्त्यांचे ही या निमित्ताने समाज बांधवांकडून आभार मानण्यात आले आहे. 

      फुले शाहु आंबेडकरवादी अनुयायी यांनी तहसीलदार सुरेश घोळवे व नगरपरिषदेचे मुख्याधिकारी ऋषभ पवार जावेद इनामदार साहेबराव मोरे यांचे पुष्पहार घालून जाहीर आभार मानले आहेत.

पोलीस निरीक्षक सुभाषचंद्र मारकड यांच्या मार्गदर्शनाखाली चोख पोलीस बंदोबस्त होता.

Share This Article
error: Content is protected !!