हिमायतनगर ता.प्रतिनिधी/बाबारावजरगेवाड
हिमायतनगर : तालुक्यातील देवाची बोरगडी हे गाव अनेक कारणांनी चर्चेत राहतांना दिसत आहे . मागील काही दिवसांपूर्वी गावातील ग्रामविकास अधिकारी यांच्या विरोधात याच गावातील युवक लक्ष्मण भैरेवाड यांनी आवाज उठवला आहे.तर मागील सात महिन्यात गारपीट सारखे नैसर्गिक आपतीमुळे अनेक पिके हे उध्वस्त झाले आहे.याच पिकाचे पंचनामे करण्याचे आदेश दिले आसता तत्कालीन तलाठी शेख मोहिन यांनी गारपिटीचे पंचनामे नूकसान स्थळावर न जाता आपल्या मर्जीतील लोकांच्या घरी बसून पंचनामे केले आहे.आसे आरोप गावातील नुकसान भरपाई पासून वंचित आसणारे शेतकरी यांनी दिनांक 24-7-2023रोजी तहसिलदार हिमायतनगर यांना निवेदनामर्फत कळविले आहे.
याच तलाठ्याने ज्या शेतकऱ्यांनी ज्वारी पेरली च नवती आशाचे पंचनामे केले व ज्या शेतकर्यांचे प्रत्यक्षांत नुकसान झाले आहे आशा शेतकऱ्यांना मात्र वार्यावर सोडले आहे.आशे प्रकारे अनेक आरोप बोरगडी ग्रामस्थ यांनी निवेदनाद्वारे केले आहे.