उद्धव मामडे यांना आदर्श पत्रकार राज्यस्तरीय पुरस्कार मायडी सेवाभावि संस्थेच्या वतीने जाहीर

abhishek bakkewad
2 Min Read
Spread the love

 

उमरी तालुका प्रतिनीधी उद्धव मामडे

उमरी :- तालुक्यातील निर्भीड पत्रकार उद्धव मोहनराव मामडे रावधानोरकर यांना”मायडी बहुउद्देशिय सेवाभावी संस्था महाराष्ट्र व दैनिक वीरशिरोमणी, साप्ताहिक नंदगिरीचा कानोसा,नांदेड यांच्या स य ुक्त विद्यमाने मान नेतृत्वाचा सन्मान कर्तृत्वाचा’ हा प्रतिष्ठेचा समजला जाणारा २०२४ चा आदर्श पत्रकार राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर करण्यात आला. असून येत्या दि. 29 सप्टेंबर 2024 रोजी गणराज पॅलेस नांदेड येथे अनेक दिग्गज मान्यवरांच्या उपस्थितीत प्रदान करण्यात येणार आहे. . .

मायडी बहुउद्देशिय सेवाभावी संस्थेचे

संस्थापक अध्यक्ष तथा साप्ताहिक

नंदगिरीचा कानोसा चे मुख्य संपादक मारोती बा.शिकारे व दैनिक वीरशिरोमणी चे मुख्य संपादक शंकरसिंह छो.ठाकूर यांच्या हस्ते दैनिक वीरशिरोमणी कार्यालय नांदेड

येथे निवड पत्र देण्यात आले.

पत्रकारीता क्षेत्रामधील उल्लेखनीय

कार्याबद्दल हा पुरस्कार त्यांना जाहीर

झाला असून त्यांना यापूर्वीही पत्रकार व सामाजिक क्षेत्रातील अनेक पुरस्कार मिळालेले आहेत. महाराष्ट्रातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या आदर्श व्यक्तीला विविध पुरस्काराने,

विविध व्यक्तींना राज्यस्तरीय हा पुरस्कार दिला जातो. यामध्ये राज्यस्तरीय पत्रकारिता, शैक्षणिक, सामाजिक,राजकीय, सांस्कृतिक, क्रीडा, संघटन,आरोग्य, कृषी, वन विभाग आदी क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल या पुरस्काराने गौरविले जाते.

       दि. २९ सप्टेंबर २०२४ रविवार रोजी होणाऱ्या हॉटेल गणराज पॅलेस नांदेड येथील दिमाखदार सोहळ्यात हा पुरस्कार वितरण सोहळा पार पडणार आहे. पत्रकार उद्धव मोहनराव मामडे रावधानोरकर यांना हा ‘मान नेतृत्वाचा सन्मान कर्तृत्वाचा’ हा आदर्श पत्रकार राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल राजकीय पक्ष पत्रकार बांधव कुटुंबा सह मित्र परिवार सर्व स्थरातून त्यांचे अभिनंदन होत आहे.

TAGGED:
Share This Article
error: Content is protected !!