नांदेड जिल्हा प्रतिनिधी:संजीवकुमार गायकवाड
नांदेड – जिल्यातील धर्माबाद तालुक्यातील शेतकऱ्यांच्या विविध मागण्यासाठी शेतकरी संघर्ष समितीच्या वतीने दिनांक 24 सप्टेंबर 2024 रोजी उपविभागीय अधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा काढण्यात आला. शेतकरी संघर्ष विकास समितीच्या वतीने उपविभागीय अधिकारी स्वाती दाभाडे यांना निवेदन देण्यात आले.
1. धर्माबाद तालुक्यात गोदावरी नदीच्या काठावरील व तालुक्यातील विविध ओढे नाले ओहोळ यांनी नुकसान बाधित झालेल्याना 100 टक्के नुकसान भरपाई त्वरित मिळावी.
2.सन 2023 सह 2024 चाही पिक विमा मंजूर करा व गतवर्षीच्या पीक विम्याची 75 टक्के रक्कम त्वरित मिळावी.
3. संभाजीनगर येथील कॅबिनेट बैठकीत झालेल्या ठरावाप्रमाणे बाभळी बंधारा बॅक वाटरणे बूडीत शेतकऱ्यांचे त्वरित नुकसान भरपाई देण्यात यावी.
4.धर्माबाद तालुका ओला दुष्काळ जाहीर करणे,
सरसकट पिक विमा लागू करणे, बाभळी बंधारा बॅक वॉटर मुळे शेतीच्या झालेल्या नुकसानाचे तात्काळ भरपाई मिळावी,बाभळी बंधारा बुडीत क्षेत्राचे प्रलंबित असलेला मावेजा वाटप करण्यात यावे.
5. महात्मा ज्योतिबा फुले कर्जमुक्ती मध्ये 2019 मध्ये मयत शेतकऱ्यांचे कर्ज माफ झाले असून त्यांच्या वारसांना नवीन पीक कर्ज व बेबाकी प्रमाणपत्र मिळवून देण्यात यावे.
यासह अनेक प्रमुख मागण्याचे निवेदन देण्यात आले
उपविभागीय अधिकारी कार्यालय,तालुका कृषी अधिकारी,तहसीलदार मॅडम,ईतर विभागाशी निगडित असलेल्या शेतकऱ्यांच्या मागण्या कडे शासनाने तातडीने लक्ष घालून त्या मागण्या सोडवण्यात यावे अशी मागणी निवेदनात करण्यात आली.
धर्माबाद तालुक्यांतील शासकिय कार्यालयाशी निगडित जे विषय असतील ते तातडीने सोडवण्यात येतील इतर ज्या मागण्या आहेत ते शासनाकडे पाठविण्यात येईल व ते पूर्ण होण्यासाठी जो पाठपुरावा अपेक्षित आहे तो करण्यात येईल असे आश्वासन यावेळी उपविभागीय अधिकारी स्वाती दाभाडे यांनी दिले आहे.
कोणताहि अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलीस निरीक्षक बाळासाहेब रोकडे यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.या आंदोलनात शहरासह ग्रामीण भागातील हजारो शेतकरी सहभागीझाले होते.