मुख्यमंत्री- माझी लाडकी बहिण योजना ,आज माहूर येथे संवाद बैठक

abhishek bakkewad
2 Min Read
Spread the love

माहूर तालुका प्रतिनिधी/विजयसिंह हजारी

माहूर – दि. २५ सप्टेंबर : सध्या राज्यात “हॅलोऽऽऽ…मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची लाडकी बहीण…….. बोलतेय!” हेच वाक्य घराघरांतून ऐकू येतय.त्याचं कारण म्हणजे महिलांना रक्ताच्या नात्याइतकाच महत्त्वाचा एक नव्हे तर, तीन मानाचे भाऊ मिळाले आहेत.ते म्हणजे मुख्यमंत्री, आणि दोन उपमुख्यमंत्री ज्यांच्या संकल्पनेतून साकार झालेली व सुरू करताच कमालीची लोकप्रिय होऊन सुपर डुपर हीट ठरलेली महिलांना दरमहा १५०० रुपये अर्थसहाय्य करणारी महाराष्ट्र शासन,

महिला व बालविकास विभागाची *”मुख्यमंत्री- माझी लाडकी बहीण योजना”* या योजनेची *संवाद बैठक* आज बुधवार दि.२५ सप्टेंबर रोजी दुपारी १२:०० वा. स्थानिक बालाजी मंगलम् माहूर येथे किनवट माहूर विधानसभा मतदारसंघाचे विकासपुरुष लोकप्रिय आमदार भीमराव रामजी केराम यांच्या अध्यक्षतेखाली महिला व बाल विकास विभाग, माहूर यांच्या वतीने आयोजित करण्यात आली आहे.

अल्प उत्पन्न असणाऱ्या महिलांना दरमहा १५०० रुपये अर्थसहाय्य करणारी महाराष्ट्र शासन,महिला व बालविकास विभागाची ‘मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजना’ जुलै महिन्याच्या लाभापासून सुरू करण्यात आली आहे.ज्यायोगे जुलै व ऑगस्ट या दोन महिन्याचे प्रत्येकी दिड हजार प्रमाणे तीन हजार रुपये पात्र लाभार्थीं महिला लाडक्या बहिणींच्या बॅंक खात्यात जमा देखील करण्यात आले आहेत.आता सप्टेंबर चा तीसरा हप्ता लवकरच लाभार्थींना देण्यासाठी हालचाली सुरू आहेत.या योजनेचा आढावा घेण्यासाठी सध्या शासन, प्रशासनाकडून जागोजागी संवाद बैठकीचे आयोजन करण्यात येत असून, याच पार्श्वभूमीवर आज माहूर शहरातील बालाजी मंगलम् येथे दुपारी वाजता एका संवाद बैठकीचे आयोजन महिला व बालविकास विभाग,माहूरच्या वतीने करण्यात आले आहे. बैठकीला तहसीलदार किशोर यादव, पं.स.गटविकास अधिकारी तथा प्रशासक सुरेश कांबळे,नगरपंचायत मुख्याधिकारी विवेक कांदे,तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.माचेवार,एकात्मिक बाल विकास प्रकल्प अधिकारी यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. 

     माहूर तालुक्यातील एकही पात्र लाडकी बहिण योजनेच्या लाभापासुन वंचित राहू नये यासाठी आज बुधवार दि.२५सप्टेंबर रोजी आयोजित संवाद बैठकीला पक्षाचे पदाधिकारी,कार्यकर्ते, व पात्र लाभार्थीं महिलांनी शहरातील मातृतीर्थ मार्गावरील बालाजी मंगलम् येथे जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन तहसीलदार किशोर यादव यांनी केले आहे.

Share This Article
error: Content is protected !!