माहूर तालुका प्रतिनिधी विजयसिंह हजारी
माहूर – स्वच्छता ही मनुष्य जीवनातील प्राथमिक गरज असून, ती प्रत्येकाने जोपासली पाहिजे.स्वच्छतेच्या बाबतीत आपले तीर्थक्षेत्राचे माहूर शहर हे प्रथम क्रमांकाचे शहर बनविण्यासाठी सर्वांना प्रयत्न करावे लागणार आहेत. त्यासाठी शहरवासीयांनी सहकार्य करावे!” असे आवाहन मुख्याधिकारी विवेक कांदे यांनी केले आहे.
केंद्रीय गृहनिर्माण तथा शहरी कार्य मंत्रालय,भारत सरकार यांनी स्वच्छ भारत अभियान २.० अंतर्गत स्वच्छता पंधरवडा मार्फत ‘स्वच्छ्ता ही सेवा अभियान’ अंतर्गत स्वभाव स्वच्छता, संस्कार स्वच्छता ही मोहीम १७ सप्टेंबर ते ०२ ऑक्टोंबर दरम्यान राबविण्याचे कळविलेले आहे. त्यानुषंगाने आज बुधवार दिनांक २५ रोजी माहूर नगरपंचायतचे मुख्याधिकारी विवेक कांदे यांच्या मार्गदर्शनात शहरातील मातृतिर्थ तलाव रस्त्यावर ‘स्वच्छता मोहीम’ राबविण्यात आली.त्यावेळी ते बोलत होते.
महात्मा गांधीजी यांच्या जयंती निमित्त त्यांना आदरांजली अर्पण करण्यासाठी १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर २०२४ या कालावधीत माहूर नगर पंचायतीच्यावतीने ‘स्वच्छता ही सेवा’ पंधरवडा अंतर्गत ‘स्वभाव स्वच्छता-संस्कार स्वच्छता’ हे अभियान राबविण्यात येत आहे.
यावेळी मार्गदर्शन करताना नगराध्यक्ष फिरोज दोसानी म्हणाले की,शहर स्वच्छ व सुंदर करण्याबरोबरच शहरातील नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीकोनातूनही सफाई कर्मचाऱ्यांचे योगदान अत्यंत महत्वाचे आहे. राज्यातील एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र असलेल्या श्रीक्षेत्र माहूर शहराला सुंदर साजेसे स्वरूप देण्यासाठी नगर पंचायत कडून राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांना शहरातील नागरिकांचा उस्फुर्त प्रतिसाद सदैव मिळत आलेला आहे.नागरिक ओला आणि सुका कचऱ्याचे विलगीकरण करून स्वच्छतेच्या उपक्रमात स्वयंस्फूर्तीने सहभाग घेत असतात!” अशा शब्दांत कृतज्ञता व आभार व्यक्त करत ‘स्वच्छता ही सेवा’ या उपक्रमात देखील शहरातील नागरिकांनी सक्रीय सहभागी व्हावे !” असे नम्र आवाहन देखील दोसानी यांनी केले.
राबविण्यात आलेल्या अभियानात मुख्याधिकारी विवेक कांदे,नायब तहसीलदार डॉ.राजकुमार राठोड, कार्यालयीन अधीक्षक वैजनाथ स्वामी, नपं चे कर्मचारी संदिप गजलवाड,देविदास जोंधळे, विशाल ढोरे,देविदास सिडाम, सुरेंद्र पांडे,शेख मजहर,गणेश जाधव,विजय शिंदे,बसवंत कल्याण,रामसिंह थुरवाल, अनिल खडसे,नईम पाशा,जीवन खडसे,राहूल खंदारे,समाधान राठोड,विलास बोरकर,शेख शब्बीर, संदिप गोस्वामी व स्वच्छता कामगार सहभागी होते.