उमरी तालुका प्रतिनीधी उद्धव मामडे
उमरी येथील कै. बाबासाहेब देशमुख गोरठेकर महाविद्यालयात विद्यार्थी-शिक्षक-पालक मेळावा नूतन विद्यालय सेवाभावी शिक्षण संस्थेचे सचिव मा. कैलासभाऊ देशमुख गोरठेकर साहेबांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला. या मेळाव्यास उद्घाटक म्हणून लाल बहादूर शिक्षण संस्थेचे सचिव मा. शिरीषभाऊ देशमुख गोरठेकर साहेब उपस्थित होते. मेळाव्यास उमरीचे तहसीलदार मा. प्रशांत थोरात, नायब तहसीलदार मा. काशिनाथ देशटवाड, डॉ. विश्वाधार देशमुख (यशवंत महाविद्यालय, नांदेड), महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. विलास गणिपूरकर इ. ची उपस्थिती होती. नायब तहसीलदार मा. काशिनाथ देशटवाड, तहसीलदार मा. प्रशांत थोरात, डॉ. विश्वाधार देशमुख यांनी विद्यार्थी आणि पालकांना नवीन राष्ट्रीय धोरण, स्पर्धा परीक्षा, ग्रामीण विद्यार्थ्यांसमोरील आव्हाने, उच्च शिक्षणाचे महत्त्व आणि समस्या, पालक आणि शिक्षकांची भूमिका या विषयावर सविस्तर असे मार्गदर्शन केले. पालकांनी ही याप्रसंगी आपल्या प्रतिक्रिया प्रकट केल्या आणि कै. बाबासाहेब देशमुख गोरठेकर महाविद्यालयाबद्दल, येथील शिक्षणाबद्दल समाधान व्यक्त केले.