मुख्याध्यापक जी.टी.दुधाडे यांना तालुकास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित….

abhishek bakkewad
1 Min Read
Spread the love

 

हिमायतनगर प्रतिनिधी /लक्ष्मण भैरेवाड 

हिमायतनगर – पंचायत समिती कार्यालय व कै.पंजाबराव पाटील जळगावकर प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने तालुकास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार कार्यक्रमाचे आयोजन दिं.२६ सप्टेंबर रोज शुक्रवारी हिमायतनगर येथील मंगल कार्यालयाच्या सभागृहात प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाले आहे.आमदार माधवराव पाटील जवळगांवकर यांच्या हस्ते तालुकास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्काराने मातोश्री जतनबाई शेखावत प्राथमिक माध्यमिक आश्रम शाळा हिमायतनगरचे कर्तव्यदक्ष, उपक्रमशील,व्यासंगी मुख्याध्यापक गणपत तुळशीराम दुधाडे करंजीकर यांना परिवारासह गुरुगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.या तालुकास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार कार्यक्रमाचेअध्यक्ष म्हणुन लोकप्रियआमदार माधवराव पाटील जवळगांवकर तसेच उद्घाटक म्हणुन खासदार नागेश पाटील आष्टीकर तर प्रमुख पाहुणे म्हणून मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती मीनल करणवाल जिल्हा परिषद नांदेड,श्रीमती सविता बिरगे शिक्षणाधिकारी प्राथमिक विभाग जिल्हा परिषद नांदेड,श्रीमती पल्लवी टेमकर तहसीलदार, प्रल्हाद जाधव गटविकास अधिकारी पंचायत समिती,गटशिक्षणाधिकारी शिवानंद शिवाचार्य,केशव मेकाले सह विविध शैक्षणिक,सामाजिक,राजकीय, सांस्कृतिक क्षेत्रातील अनेक मान्यवर या कार्यक्रमास उपस्थित होते.

       तालुकास्तरील आदर्श शिक्षक पुरस्कार तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा,खाजगी अनुदानित, विनाअनुदानित शाळेतील शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय तसेच उपक्रमशील शिक्षकांना व त्यांच्या परिवारासह तालुकास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला आहे. यावेळी तालुक्यातुन अनेक शिक्षक व त्यांच्या परिवारांची उपस्थिती लाभलेली होती. मुख्याध्यापक जी.टी.दुधाडे सरांना आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात आल्यानंतर त्यांच्या मित्रपरिवार,नातेवाईक,पत्रकार बांधवांकडून अभिनंदनाचा वर्षाव केला जात आहे.

Share This Article
error: Content is protected !!