एक मोठे रॉकेट जिल्ह्यात सक्रिय झाल्याची चर्चा
नांदेड जिल्हा प्रतिनिधी:संजीवकुमार गायकवाड
नांदेड – धनेगाव,मुजामपेठ,वाजेगाव आणि देगलूर नाका भागात भंगार दुकानाच्या नावाखाली वाहनांचे स्पेअर पार्ट संबंधितांना कोणी दिली परवानगी? वाहन चोरांना नामी संधी
नांदेड शहराच्या देगलूर नाका,वाजेगाव,धनेगाव, मुजामपेठ भागामध्ये मोठ्या प्रमाणात भंगार दुकानांच्या नावाखाली आलेल्या चोरीच्या वाहनांचे डिस्पोजल केले जाते.यासाठी दुकानदारांनी कोणाची परवानगी घेतली? डिस्पोजल करणाऱ्या दुकानदारांना आरटीओनी परवानगी दिली का? असे असंख्य प्रश्न उपस्थित होत असतानाच नांदेड ग्रामीण पोलिसांनी लक्ष देण्याची गरज.वाहनधारकांना चोरलेले वाहन काही तासाच्या आत डिस्पोजल करून भंगारमध्ये विकल्या जात असल्याने अनेक चोरींच्या दुचाकी,चार चाकी वाहनांचा पत्ता लागत नाही. डिस्पोजल करणाऱ्या भंगार दुकानांची वरिष्ठ पातळीवरून चौकशी केल्यास हा धक्कादायक प्रकार उघडकीस येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
यापूर्वीही अशा दुकानांमध्ये तेलंगणातून पळवून आणलेल्या परिवहन महामंडळाच्या एका बसला काही तासाच्या आत डिस्पोजल करून भंगारमध्ये विकल्या गेले होते.भंगार दुकान (डिस्पोजल) बाबत योग्य ती माहिती घेऊन चौकशी करण्यात यावी अशी मागणी शेख एजास शेख बाबु यांनी केली होती.
नांदेड शहरालगत धनेगांव येथील भंगार (डिस्पोजल) दुकान के. एल.पी.कॉलनीसमोर,सुपर ट्रान्सपोर्टच्या मागे लातुर रोड धनेगांव येथे व अनेक ठिकाणी भंगार दुकानात अनेक वाहने भंगार म्हणून तोडली जातात असे समजले असून त्याबाबतचे सदरील ठिकाणी नियमानुसार प्रादेशीक परिवहन कार्यालय, नांदेड व इतर कार्यालयची परवागी घेऊनच वाहन तोडले (स्क्रॅप) केले जाते काय ? असा प्रश्न विचारला जात आहे.
सदरील भंगार दुकानांमध्ये डिस्पोजल करण्यासाठी वाहने कुठून येतात ? कोण आणते त्याबाबतत कागदपत्र ते घेतात काय ? तसेच सदरील तोडलेली वाहने पुन्हा कुठे नेली जातात ? किंवा त्याचे स्क्रॅप केलेले पार्ट हे कोण खरेदी करतात ? त्याचेकडे दुकानाचे लायसेन्स आहे काय ? या व अश्या अनेक प्रश्ना बाबत माहिती घेतली तर धक्कादायक प्रकार उघडकीस येण्याची शक्यता नाकारता येत नाही. विशेष म्हणजे चोरी केलेली वाहनं,पळवून आलेली वाहने,रस्त्याने अपघात होऊन पुरावा नष्ट होणारी वाहने अश्या वाहनांची माहिती होऊ शकते. सदरची माहिती घेतल्यास त्याचे सत्य व गुपीत उलगडा होऊन एखादा गुन्ह्याबाबत देखील तपास होऊ शकतो.याबाबत पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार किंवा अतिरिक्त पोलीस अधीक्षक सुरज गुरव व उपविभागीय पोलीस अधिकारी सुशीलकुमार नायक यांनी या प्रकरणात विशेष लक्ष घातल्यास शहर व परिसरातून चोरी होणाऱ्या वाहनांचेच डिस्पोजल या भंगार दुकानात होते की काय याची माहिती घेतल्यास मोठा घोटाळा उघडकीस येण्याची शक्यता व्यक्त केल्या जात आहे.