पाचशे रुपयाची लाच मागणाऱ्या वाहन निरीक्षक अमोल खैरनार यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल.

abhishek bakkewad
2 Min Read
Spread the love

नांदेड जिल्हा प्रतिनिधी:संजीवकुमार गायकवाड

नांदेड – जिल्यातील देगलूर येथील आरटीओ सीमा तपासणी नाका येथे कार्यरत असलेल्या अमोल धर्मा खैरनार व 42 वर्षे या वाहन निरीक्षकास पाचशे रुपयाची लाच घेताना देगलूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

         यातील तक्रारदार हे ट्रान्सपोर्ट ट्रक मालक असून त्यांची अकोला ते हैदराबाद रोडवर ट्रक चालतात त्यामुळे नांदेड जिल्ह्यातील देगलूर येथील आरटीओ विभागाचे अधिकारी व त्यांनी ठेवलेले प्रायव्हेट एजंट हे त्यांचे कडील ट्रकच्या ड्रायव्हर कडून गाडीचे सर्व कागदपत्रे बरोबर असताना व गाडीचे वजन बरोबर असतानाही इनटीच्या नावाखाली पाचशे रुपयाची लाचेची मागणी करीत असल्याबाबत 24 9 2024 रोजी तक्रार दिल्यावरून आज दिनांक 25 9 2024 रोजी केलेल्या पडताळणीत कारवाही दरम्यान देगलूर येथील आरटीओ चेक नाक्यावरील खाजगी एजंट श्री गोपाळ इंगळे यांनी पंचायत समक्ष व व आरटीओ चेक अमोल खैरनार मोटर वाहन निरीक्षक देगलूर चे पोस्ट यांच्या उपस्थितीत तर जोडी आमची पाचशे रुपये लाचेची मागणी करून स्वीकारल्याचे मान्य केल्याने तसेच आयोजित सापळा कारवाईदरम्यान पाचशे रुपये श्री अमोल खैरनार मोटर वाहन निरीक्षक देगलूर चे पोस्ट यांच्या समक्ष लाज रक्कम स्वीकारल्याने वरून नमूद आलेले अमोल खैरनार व खाजगी सं गोपाळ इंगळे यांना लाच रकमेसह ताब्यात घेण्यात आले असून सापळा कारवाई दरम्यान आलोसे यांच्या आता कार्यालयातून रोख रक्कम 63820 रुपये मिळून आल्याने त्याबाबत आलोसे यांच्याकडे नमूद रकमेबाबत विचारणा केली असता त्याबाबत त्यांनी योग्य समाधान कारक उत्तर दिले नाही तसेच सदर रकमेबाबत कॅशबुक रजिस्टर ला कोणत्याही कायदेशीर नोंदी दिसून आल्या नाही त्यामुळे नमूद रक्कम पंचांसमक्षे पुढील तपास कामी जप्त करण्यात आली आहे तसेच त्यांच्याविरुद्ध देगलूर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

 पुढील तपास पोलीस अधीक्षक मारुती जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली सचिन शिंदे अनिल पवार या कारवाईमध्ये मंगेश मोहोळ पोलीस कॉन्स्टेबल युवराज राठोड पोलीस हवालदार राजेश मेटकर,आशिष जांभळे वैभव जायले हे या प्रकरणाचा अधिक तपास करीत आहेत.सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येईल की कोणत्याही शासकीय अधिकारी कर्मचारी यांनी किंवा त्यांच्या वतीने खाजगी समाने त्यांच्या कोणत्याही शासकीय काम करून देण्यासाठी लाचेची मागणी केल्यास तात्काळ लासलुचपतक प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधावा असे आव्हान करण्यात आले आहे.

Share This Article
error: Content is protected !!