कलवले गुरुजी यांना लसाकम भुषण पुरस्कार जाहीर

abhishek bakkewad
1 Min Read
Spread the love

उद्या रविवारी लसाकम राज्याध्यक्ष थोटवे यांच्या हस्ते होणार पुरस्कार वितरण

नांदेड जिल्हा प्रतिनिधी बजरंगसिंह हजारी

  नांदेड – येथील सेवानिवृत्त मुख्याध्यापक, लहू, फुले, शाहू,बाबासाहेब, अण्णाभाऊ या महापुरुषांचे विचार घेऊन परिवर्तनवादी चळवळीत काम करणारे मार्गदर्शक,जेष्ठ सामाजिक क्रियाशील कार्यकर्ते भारत माधवराव कलवले (गुरुजी) यांना क्रांतिवीर लहूजी साळवे कर्मचारी महासंघाच्यावतीने दिला जाणारा विशेष गौरवण्यात येणारा ” लसाकम भुषण पुरस्कार ” नुकताच जाहीर झाला आहे.या पुरस्काराचे वितरण उद्या रविवार दिनांक 29 सप्टेंबर 2024 रोजी सकाळी 11 वाजता कै. नरहर कुरुंदकर सभागृह पीपल्स कॉलेज नांदेड येथे लसाकमचे राजाध्यक्ष बालाजीराव थोटवे यांच्या शुभ हस्ते होणारअसून,या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मराठवाडा अध्यक्ष निरंजन तपासकर हे राहणार आहेत. 

 कार्यक्रमास इंजि. डी.जी.पोतरे, इंजि. दिलीप हनमंते दिपक गवलवाड,इंजि.अरूण कलवले,पी.एल.दाडेराव यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे. पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल नांदेड जिल्हाध्यक्ष संजय मोरे, उपाध्यक्ष बालाप्रसाद भालेराव,सखाराम जांभळीकर,परमेश्वर पेटे, लक्ष्मण गोटमुकले,संजय गोटमुखे यांच्यासह अनेक मान्यवरांकडून कौतुकासह अभिनंदनाचा वर्षाव करण्यात येत आहे.

TAGGED:
Share This Article
error: Content is protected !!