जिल्हा प्रतिनिधी नांदेड/
नांदेड – राष्ट्रसंत सद्गुरु श्री साईनाथ महाराज वसमतकर, बितनाळकर यांच्या सामाजिक कार्याचे स्वरूप महाराष्ट्रच काय पुर्ण देशभरात वेगाने घडत आहे. या कार्याची दखल घेऊन परभणीचे आमदार श्री राहूलजी पाटील यांनी एक आरामदायी वातानुकूलित सर्व सोयी सुविधेसह बनवलेली बस सद्गुरु श्री साईनाथ महाराज यांना भेट देवून त्यागाच्या भावनेचा साक्षात्कार दाखवून दिला आहे.
सदर बस गाडीत स्वयपाक सुविधा, स्वच्छालय, भजनासाठी आसन व्यवस्था, आराम व्यवस्थेसह वातानुकूलित असलेली ही बस भक्तांसाठी एक कुतूहलाची लक्षणीय बाब ठरली आहे.
या गाडीचे नांदेड येथे आगमन झाले असता शासकीय विश्रागृह येथे दै. प्रजावाणीचे संपादक तथा ज्येष्ठ पत्रकार श्री गोवर्धन बियाणी यांचे हस्ते गाडीला हार अर्पण करून नारळ फोडून अनावरण करण्यात आले.
यावेळी गोल्ला गोलेवार यादव महासंघाचे प्रांत अध्यक्ष श्री भुमन्ना आक्केमवाड भोसीकर, प्रजावाणीचे उपसंपादक श्री रविंद्र कुलकर्णी, श्री पी. पी. फांजेवाड, डॉ. गंगाधर इंद्रवाड, श्री परशूराम आक्कमवाड, श्री बालाजी शेणेवाड, श्री अंबादास आटपलवाड, श्री तुकाराम कैलवाड, श्री अनुप आंनमवार, श्री विठ्ठलराव जकीलवाड, माजी जि.प. सदस्य श्री दिलीपराव बास्टेवाड, श्री बालाजी खर्डे पाटील, श्री दत्तात्रेय मोहिते, श्री अशोकराव कुंटुरकर, श्री प्रकाश राठोड, श्री गणपतराव आडे, श्री निळू पाटील, श्री लक्ष्मण ढगे व ईतर भक्तगण उपस्थित होते.