हिमायतनगर पोलीस मित्र तालुकाध्यक्ष पदी लक्ष्मण भैरेवाड तर उपाध्यक्ष पदी निलेश शैनेवाड यांची निवड.  

abhishek bakkewad
2 Min Read
Spread the love

हिमायतनगर प्रतिनिधी/

हिमायतनगर-पोलीस मित्र संघटना नवी दिल्ली भारत पोलीस मित्र संघटनेचे बैठक दि.29/9/24रोजी तळ्यावरचा गणपती मंदिर येथे पार पडली आहे.          

 कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अंकुश मेटकरी महाराष्ट्र पोलीस मित्र जनसंपर्क प्रमुख यांच्या अध्यक्षतेखाली पोलिस मित्र संघटना कार्यकारिणी जाहीर करण्यात आले.प्रमुख उपस्थित म्हणून नांदेड जिल्हा उपाध्यक्ष सदाशिव पतंगे होते,पोलीस मित्र संघटनेचे तालुकाध्यक्षपदी लक्ष्मण बालाजी भैरेवाड, उपाध्यक्ष निलेश शैनेवाड,पोलीस मित्र ता.अध्यक्ष लक्ष्मण बालाजी भैरेवाड. तर उपाध्यक्ष निलेश शेन्नेवाड, पोलीस मित्र संघटनेचे सदस्य मारोती भैरेवाड,ओम काईतवाड,योगेश झुंकुटवाड, राज काईतवाड,बजरंग कोळगिर, परमेश्वर कोळगिर, आकाश कदम,आवधुत सोलंकर,आवधुत गोपुवाड, बजरंग काईतवाड, सिधु काईतवाड, भागवत काईतवाड, संतोष कदम, केरबा कदम,मारोती कदम. नंदकिशोर वानखेडे. संतोष शामलवाड,भागवत जळपते, योगेश पिसकेवार, नितिन जंगेवाड, राम कोमलवाड,शिवाजी बाचकलवाड, शाम सिंह राजपुत,विठ्ठल सुर्यवंशी,विषाल राठोड,आशिष राठोड, यांची सर्वानुमते निवड करण्यात आली, सर्व नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा सत्कार करुन शुभेच्छा देण्यात आले.

 तालुकाध्यक्ष पदासाठी एकमेव लक्ष्मण भैरेवाड यांचेच नाव आल्याने उपस्थित पोलीस मित्र सदस्यानी एकमताने अनुमोदन दिल्याने निवड बिनविरोध करण्यात आली. त्यानंतर तालुका अध्यक्ष लक्ष्मण भैरेवाड यांनी उर्वरित कार्यकारिणी लवकरच जाहीर करणार आहेत, भैरेवाड बोलताना म्हणाले की येणाऱ्या काळात सामाजिक राजकीय कार्यासाठी मी नेहमीच तत्पर आहे माझ्याकडे तालुका अध्यक्ष पदांची जबाबदारी संपूर्णपणे न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करत राहणार पोलीस मित्र सदस्यांना कोणत्याही विषयावर अडचण आली तर मी तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिल आहे असे प्रतिपादन केले.

बिनविरोध निवडीमुळे पोलीस मित्र संघ एकजूट राहण्यास मदत होते असे यावेळी आवर्जून सांगितले पोलीस मित्र महाराष्ट्र जनसंपर्क प्रमुख अंकुश मेटकरी सांगितले आहे.

हिमायतनगर तालुक्यातील पोलीस मित्र यांनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाचे सुत्रसंचालन पोलीस मित्र जिल्हा उपाध्यक्ष सदाशिव पतंगे यांनी केले.

Share This Article
error: Content is protected !!