महाराष्ट्र राज्य नगर परिषद /नगर पंचायत कर्मचारी, संवर्ग कर्मचारी संघटनेचा राज्यस्तरीय मेळावा तासगाव जि.सांगली येथे संपन्न
नांदेड जिल्हा प्रतिनिधी/बजरंगसिंह हजारी
माहूर – रविवार दिनांक २९ सप्टेंबर रोजी तासगाव जि.सांगली येथे नगर परिषद, नगर पंचायत कर्मचारी संघटनेचा राज्यस्तरीय मेळावा संघटनेचे प्रमुख रामेश्वर वाघमारे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला.यामध्ये माहूर येथे कार्यरत असलेले नगर पंचायत माहूरचे कार्यालय अधिक्षक वैजनाथ स्वामी यांची संघटनेच्या संघटक पदावरुन संघटनेच्या महाराष्ट्राच्या मुख्य संघटक पदावर पदोन्नती देऊन निवड करण्यात आली.तर देविदास सिडाम यांची नांदेड जिल्हा सहसचिव पदावर निवड करण्यात आली आहे.
संघटनेचे माहूर येथील अध्यक्ष म्हणून गणेश जाधव,सचिव सुरेंद्र पांडे यांची तर कोषाध्यक्ष म्हणून अनिल खडसे यांच्या निवडी संघटनेचे राज्य प्रमुख रामेश्वर वाघमारे व संघटनेचे राज्य अध्यक्ष अनिल पवार यांच्याकडून घोषीत करण्यात आलेल्या आहेत. स्थानिक संघटनेची उर्वरित कार्यकारीणी गणेश जाधव यांनी माहूर येथे बैठक घेऊन जाहीर करावी असे सांगण्यात आले.यावेळी या मेळाव्यासाठी नांदेड जिल्ह्यासह राज्यभरातील हजारो कर्मचारी उपस्थित होते.माहूर येथील या कर्मचाऱ्यांच्या संघटनेवर निवडी झाल्या असल्याने शहरातील सर्व नागरीकातुन अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.