भाऊराव चव्हाण सहकारी साखर कारखान्यावर युवक काँग्रेसचा रुमणे मोर्चा धडकला

abhishek bakkewad
2 Min Read
Spread the love

कारखाना प्रशासनाला विविध मागण्यांचे दिलें निवेदन

नांदेड जिल्हा प्रतिनिधी:संजीवकुमार गायकवाड

नांदेड – जिल्यातील अर्धापूर माजी मुख्यमंत्री खा. अशोकराव चव्हाण संस्थापक अध्यक्ष असलेल्या भाऊराव चव्हाण सहकारी साखर कारखान्यावर युवक काँग्रेसच्या वतीने विविध मागण्यासाठी गुरुवारी (ता २६) रुमणे मोर्चा काढण्यात आला.कारखान्याचे कार्यकारी संचालकांना विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले. शेकडो ऊस उत्पादक शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

भाऊराव चव्हाण सहकारी साखर कारखाना स्थापन झाल्या पासून युवक काँग्रेसच्या वतीने पहिलाच मोर्चा काढण्यात आला. मोर्चा काढण्याच्या निवेदनावर ज्या काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी स्वाक्षऱ्या केल्या होत्या,त्यापैकी काही जणांनी मोर्चा काढण्याच्या आगोदर काही दिवसांपूर्वी आपल्या या मोर्चाशी काही संबंध नाही असे लेखी कारखान्याच्या प्रशासनाला लिहून दिले होते. त्यामुळे या मोर्चाला किती प्रतीसाद मिळतो याकडे जिल्ह्यासह अर्धापूर तालुक्याचे लक्ष लागले होते. 

युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बालाजी पाटील गाडे यांच्या नेतृत्वाखाली हा रुमणे मोर्चा काढण्यात आला.ऊसाला प्रति टन तीन हजार दोनशेभाव देण्यात यावा, ऊस लागवडीपासून १४ महिन्यात तोड करण्यात यावी, ऊसाचे पैसे पंधरा दिवसात देण्यात यावे,ऊस गाळपाला कारखान्यात जाण्यापूर्वी ऊसाचे वजन कुठेही करण्याची परवानगी देण्यात यावी,इंग्रजी माध्यमाची शाळा सुरू करण्यात यावी यांसह इतर प्रमुख मागण्यांसाठी मोर्चा काढण्यात आला.

      या रुमणे मोर्चात नांदेड जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक बाबुराव कदम कोंढेकर, संचालक बाळासाहेब पाटील रावणगांवकर, काँग्रेसचे अर्धापूर तालुकाध्यक्ष सुनील वानखेडे, काँग्रेसचे मुदखेड तालुकाध्यक्ष प्रतापराव देशमुख,शहराध्यक्ष कैलास गोडसे,लक्ष्मणराव देवणे,युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष रविंद्र पाटील डाढाळे,उपाध्यक्ष संग्राम देशमुख,जिल्हा सरचिटणीस संतोष कपाटे,दादाराव पुय्यड, मारोतराव तिडके,निरंजन पावडे मुजीब पठाण,ज्ञानेश्वर मगरे,प्रशांत मुंगल,विलास कल्याणे, संदीप गौड, माधव गाडे बालाजी जांगीलवाड यांच्यासह मोर्चात कारखाना परिसरातील गावातील शेतकरी खूप मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. यावेळी मोर्चात सहभागी झालेल्या प्रमुख नेत्यांनी कारखान्याच्या प्रशासनाला धारेवर धरुन ऊस उत्पादक शेतक-यांच्या मागण्या तातडीने पूर्ण करण्याची मागणी करण्यात आली.

Share This Article
error: Content is protected !!