डाॅ.दांडेकर यांची उपायुक्तपदी नियुक्ती

abhishek bakkewad
1 Min Read
Spread the love

कार्यरत- माहूर तालुका पशुधन विकास अधिकारी श्रेणी-१

पदोन्नती- अकोला महानगरपालिका उपायुक्त

नांदेड जिल्हा प्रतिनिधी बजरंगसिंह हजारी

नांदेड – जिल्हा महाराष्ट्र शासनाच्या पशुसंवर्धन विभागात पशुधन विकास अधिकारी श्रेणी-१ म्हणून माहूर तालुक्यात कार्यरत असलेले डॉ.संतोष दांडेकर यांची सेवा वर्ग करून महाराष्ट्र शासनाने नगर विकास विभागात उपायुक्त पदावर अकोला महापालिका येथे नियुक्ती केल्याने त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे 

   डॉ.संतोष विठ्ठलराव दांडेगावकर हे मूळ तेलारी तालुका किनवट येथील रहिवासी असून,त्यांचे प्राथमिक शिक्षण किनवट येथे झाले.शिक्षण सुरू असताना त्यांनी लोकसेवा आयोगाची परीक्षा दिल्यावर यात यशस्वी होऊन त्यांची पशु वैद्यकीय विभागात श्रेणी-१ म्हणून निवड झाली.तदनंतर त्यांनी माहूर तालुक्यातील पशु वैद्यकीय विभागात उत्कृष्ट सेवा दिली.या कार्याची दखल घेऊन शासनाने पदोन्नतीवर त्यांना अकोला,महानगरपालिकेवर उपायुक्त म्हणून नियुक्ती दिली आहे. 

डॉ.दांडेकर यांना पदोन्नती मिळाल्याचे समजताच मराठवाडा मुक्ती संग्राम दिनी नगराध्यक्ष फिरोज दोसानी,मुख्याधिकारी विवेक कांदे,उपनगराध्यक्ष ज्ञानेश्वर लाड,माजी नगराध्यक्ष राजेंद्र केशवे,कार्यालय अधीक्षक वैजनाथ स्वामी,संदीप गजलवाड,देविदास जोंधळे,मजहर शेख, देविदास सिडाम,गणेश जाधव यांचेसह सर्व नगरसेवक, नगरसेविकांच्या उपस्थितीत त्यांचा यथोचित सन्मान करण्यात आलाडॉ.दांडेकर यांचे स्नेहांकीत मित्रपरिवार, प्रशासकीय विभागातील अधिकारी, कर्मचारी,प्रतिष्ठीत मान्यवर मंडळी या सर्व स्तरातून अभिनंदन केले जात आहे.

Share This Article
error: Content is protected !!