जिल्हा प्रतिनिधी/राहूल कोलते
नांदेड -मान नेतृत्वाचा सन्मान कर्तृत्वाचा या म्हणी प्रमाणे महाराष्ट्रातील अत्यंत प्रतिष्टेचा समजला जाणारा “राज्यस्तरीय आदर्श पत्रकार” पुरस्कार सोहळा नांदेड येथील गणराज पॅलेस संपन्न झाला असून हा पुरस्कार सोहळा मायडी बहुउद्देशिय सेवाभावी संस्था व दै.वीर शिरोमणी,सा.नंदगिरीचा कानोसा चे संपादक शंकर ठाकूर,मारोती शिकारे यांनी आयोजित केला होता यावेळी विविध क्षेत्रात कामकारणाऱ्या २४ पुरस्कत्याचे मान्यवरांच्या शुभहस्ते,सन्मानपत्र,सन्मानचिन्ह,स्नेह वस्त्र,ग्रंथ असे पुरस्काराचे स्वरूप असलेले
हा पुरस्कार खालील मान्यवरांच्या हस्ते मा.संजीवकुमार गायकवाड हे उच्च विद्याविभुषित असून ते प्रेस संपादक व पत्रकार संघांचे नांदेड जिल्हाध्यक्ष असून गेल्या अनेक वर्षांपासून पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत.त्यांनी केलेल्या भरीव योगदानाबद्दल हा पुरस्कार मा.आमदार ईश्वररावजी भोसीकर,कासलीवार सचिनजी,माजी बालकल्याण सभापती नांदेड वाघळा महानगर पालिका नांदेड संगीता ताई डक,वैशाली ताई हिंगोले,गणेश तादलापूरकर, ड्रॉ.कदम यांच्या शुभ हस्ते देण्यात आला आहे.
पत्रकार संजीवकुमार गायकवाड हे पत्रकारिता व सामाजिक क्षेत्रात कार्यरत असून त्यांच्या लेखणीतून सरकार,नेते, भ्रष्टाचार,राजकारणाची पोलखोल यावर आपल्या लेखणीतुन चांगलाच आसूड उगारतात.त्यांनी बातम्यां द्वारे समाजाचे मागण्याना वाचा फोडून न्याय मिळवून देणे,समाजात जनजागृती करणे,वास्तविकता मांडणे,सामाजिक प्रश्नांना वाचा फोडण्याचे,समाजप्रबोधनाचे काम त्यांनी पत्रकारितेतून केल्या बद्दल हा पुरस्कार देण्याचे आल्याचे दै. विरशिरोमणी चे संपादक शंकरसिंग ठाकूर व मायाडी बहुउद्देशीय सेवाभावी संस्था, संपादक सा.नंदगिरीचा कानोसा मा.मारोती शिकारे ह्या आयोजकांनी सांगितले आहे.
त्यांनी पत्रकारिता क्षेत्रात आपला शिक्का उमटवला आहे.यापूर्वी ही त्यांना पत्रकारिता व सामाजिक क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरीबद्दल अनेक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
त्यांना पुरस्कार देऊन सन्मान केल्या बद्दल जेष्ठ पत्रकार आनंद भालेराव,अभिषेक बकेवाड,संजय कदम,राहुल कोलते,जे.हर्जिंदरजी सिंघ संधू,उद्धवजी मामडे,आदि जणांनी अभिनंदन करत शुभेच्छा दिल्या आहेत.या निवडी बदल अनेक सामाजिक संघटना,राजकिय पुढारी व अनेक मित्र मंडळी कडून अभिनंदनाचा वर्षाव करण्यात येत आहे.