दोनशे कोटी रुपयाचा धान्य घोटाळा करणाऱ्या बाबासाहेब सुतारेला त्वरित अटक करा..पीआरओ चे जिल्हाधिकारी कार्यालय धरणे आंदोलन

abhishek bakkewad
3 Min Read
Spread the love

नांदेड जिल्हा प्रतिनिधी:संजीवकुमार गायकवाड

नांदेड – जिल्ह्यासह परभणी हिंगोली जिल्ह्यांमध्ये धान्याच्या नावावर सुशिक्षित बेरोजगारांना नियुक्ती करून दोनशे कोटी रुपयांचा घोटाळा करणाऱ्या बाबासाहेब शंकर सुतारेला त्वरित अटक करा या मागणीसाठी पीआरओ च्या वतीने मोर्चा काढून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन जिल्हाधिकारी कार्यालयापुढे धरणे आंदोलन सुरू केले आहे.

सविस्तर वृत्त असे की मागील एक वर्षा पूर्वी धार तालुका औंढा जिल्हा हिंगोली येथील छत्रपती शिवाजी महाराज बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेची स्थापना करून अध्यक्ष बाबासाहेब शंकर सुतारे यांनी नांदेड हिंगोली परभणी जिल्ह्यातील सुशिक्षित बेरोजगारांना वर्तमानपत्रांमध्ये जाहिरात देऊन आपल्या जाळ्यात ओढले व त्यांना ग्रामीण व शहरी भागामध्ये जाऊन 1100 रुपयांमध्ये गहू तांदूळ 2500 हजार रुपयांमध्ये शिलाई मशीन 25000 हजार रुपयांमध्ये इलेक्ट्रॉनिक स्कुटी वयोवृद्धांना 5000 हजार रुपये पेन्शन या योजनेचे फॉर्म भरून पी आर ओ च्या माध्यमातून पैसे गोळा करून स्वतःकडे जमा करून लाभार्थ्यांना कोणतीच वस्तू न देता पळून जाऊन 200 कोटी रुपयांचा घोटाळा केला आहे.

मुख्य आरोपीच्या विरोधात वजीराबाद पोलीस ठाण्यामध्ये एक वर्षापूर्वी गुन्हा दाखल झाला आहे परंतु अद्यापही काही आरोपी व मुख्य सूत्रधार असलेला बाबासाहेब शंकर सुतारे हा फरार असून त्यांच्यावर पोलीस प्रशासनाच्या वतीने एक लाख रुपयांचे बक्षीस् ही जाहीर केले आहे परंतु अद्यापही सुतारेचा ठावठिकाणा पोलीस प्रशासनाला लागलेला नाही पोलीस जाणून-बुजून त्याला अटक करीत नाही की काय? की सुतारे पोलिसांना सापडत नाही हा पीआरओ ला पडला आहे पोलिसांच्या तपासावर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे.

 त्यामुळे त्यांला त्वरित अटक करा व आमचे पैसे आम्हाला परत द्या या मागणीसाठी पिआर ओ च्या वतीने आज दिनांक 30 सप्टेंबर 2024 रोजी डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याला अभिवादन करून छत्रपती शिवाजी महाराज पुतळा मार्गे मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला व जिल्हाधिकारी मार्फत मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री समाज कल्याण मंत्री यांना निवेदन देऊन बाबासाहेब शंकर सुतारेला त्वरित अटक करा या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालय बेमुदत उपोषण सुरू केले आहे.पिआरओ आमरण उपोषण स्थळी मोठ्या प्रमाणात सहभाग झाले आहेत.

 आजपासून पीआरओच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालया पुढे बेमुदत धरणे आंदोलन सुरू करण्यात आले आहे

1)अध्यक्षा : सौ.शोभाबाई वसंतराव गिरबीडे हदगांव यांच्या नेतृत्वाखाली.2)उपाधक्षा : सौ रंजना संजय सोनकांबळे 3)उपाध्यक्ष : सुभाष शंकर लोने.रा. लोन अर्धापूर 4)संभाजी रोहिदास सावते येळेगाव.5)बालाजी गंगाराम इंगोले.रा.निळा 6)चंद्रकांत आनंदराव फुगारे. रा मांजरम, नायगाव.7)सदाशिव रामा नरवाडे रा.रुपला क्षमा वाघमारे,ज्योती जोंधळे,उज्ज्वला वाघमारे कोमल भोकरे शिल्पा गच्चे विजय भिसेअर्चना थोरात,संगीता लोणे,वर्षा कांबळे,शिल्पा सावते,नागोराव निवडगे, दिलीप भालेराव,प्रवीण वैद्य हणमंत सांगडे,नवनाथ सावंत उमेश टोम्पे,बालाजी लोणे आदी जणांनी बेमुदत उपोषण सुरू केले आहे.

Share This Article
error: Content is protected !!