स्वच्छता कर्मचाऱ्याकडून दोन हजार रुपयाची लाच स्वीकारताना अटक.

abhishek bakkewad
2 Min Read
Spread the love

नांदेड जिल्हा प्रतिनिधी:संजीवकुमार गायकवाड

नांदेड – दि.२.वाघाळा मनपा अंतर्गत आर अँड बी इन्फ्रा प्रोजेक्ट प्रायव्हेट लिमिटेड अंतर्गत कंत्राटी महिला सफाई कामगार यांनी आगषट 2024 ची पगार देण्यात यावी म्हणून स्वच्छता निरीक्षक अकबर खान उस्मान खान वय. 47 वर्ष यांनी सदरील सफाई कामगार महिलेची पगार काढून देतो म्हणून पाच हजार रुपयाची मागणी केली होती.

  तडजोडीनंतर चार हजार रुपये देण्याचे ठरले. सदरील सफाई कामगार महिलेस लाच देण्याची इच्छा नसल्यामुळे त्यांनी लाच लुचपत प्रतिबंधक विभाग नांदेड येथे याबाबत तक्रार केली. नमूद केलेल्या तक्रारीवरून लाच लुचपत प्रतिबंधक विभाग नांदेड यांनी दि.1ऑक्टोंबर 2004 रोजी लाच मागणी प्रकरणी सापळा रचून कारवाई करण्यात आली त्यानंतर कारवाईत आरोपी लोकसेवक यांनी तक्रारदार ही या महिलेस पंचा समक्ष कारवाई करण्याचे ठरले होते. 

कामाचे दिवस खाडे न टाकण्यासाठी 4000 रुपयाची लाचेची रक्कम स्वीकाराचे मान्य केले .त्यानंतर सापळा कारवाई दरम्यान,मंगेश मेडिकल समोरील रोडवर येथील नगर नांदेड येथे आरोपी लोकसेवक यांनी तक्रारदार या महिलेकडून लाचेची रकमेचा पहिला हप्ता म्हणून दोन हजार रुपये स्वतः च्या मोटरसायकलच्या पेट्रोलच्या टाकी होईल कव्हर मध्ये ठेवण्याचे सांगून इशारा करून लाचेची रक्कम स्वीकारली आहे.

यातील आरोपी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ताब्यात घेतला असून त्यांच्याविरुद्ध विमानतळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.हा सापळा यशस्वी करण्यासाठी पोलीस हेडकॉन्स्टेबल शेख रसूल, किरण कणसे ,राजेश राठोड चालक पोलीस नायक प्रकाश मामुलवार यांनी मिळत घेतली.

Share This Article
error: Content is protected !!