नांदेड जिल्हा प्रतिनिधी:संजीवकुमार गायकवाड
नांदेड – क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत व जिल्हा क्रीडा अधिकारी लातूर मार्फत दिनांक १ ऑक्टोबर २०२४ जिल्हा क्रीडा संकुल लातूर इनडोअर हाल मध्ये घेण्यात आलेल्या विभागीय स्तरावर कुस्ती स्पर्धेत हुतात्मा पानसरे हायस्कूल चे १७ वर्षाखालील मुलींमध्ये ६५ किलो वजन गटात कु.प्रीती भीमराव राठोड विभागात द्वितीय क्रमांक आल्याबद्दल संस्थेचे अध्यक्ष श्री रामचंद्र पाटील बन्नाळीकर व सचिव श्री विश्वनाथराव पाटील बन्नळीकर कोषाध्यक्ष श्री राम पाटील बाळापुरकर संस्थेचे सर्व विश्वस्त तसेच मुख्याध्यापक श्री सन्मुख बेंबरेकर उप मुख्याध्यापक श्री रामेश्वर गायकवाड प्रयवेक्षक श्री मोहन पुलकंटवार.श्री नरेश जिदमवार व माजी सैनिक क्रीडाशिक्षक संजय पंदिरवाड सर्व शाळेतील वरिष्ठ शिक्षकवृंद व शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थ्यांचे पालक सर्व क्रीडाप्रेमी अभिनंदन व कौतुक करत आहे.