शेतकऱ्यांची नुकसान भरपाई ची मागणी
उमरी तालुका प्रतिनीधी उद्धव मामडे
उमरी : तालुक्यातील हुंडा ग.प. गावातील होतकरू शेतकरी शंकर बापुराव शिदे यांचा गट क्रमांक 159 या मधील ऊस अचानक पेट घेतला असून यात हजारो टन ऊस लाईटच्या शाॅट सर्कीटने जळुन खाक झाल्याच शेतकरी शंकर शिंदे यांनी दैनिक हिंदूसम्राट प्रतिनीधीशी बोलतांना सांगीतले आहेत. सदर,या परिसरात मागील १० ते १५ दिवसांपासून रिमझिम पाऊस सुरू आहे. पंधरा दिवसापासून सुर्यदर्शन झालेले नसल्यामुळे याचा पिकांना मोठा फटका बसत आहे. रोजच्या रिमझीम पावसाने सोयाबीन,कापूस, तूर पिवळे पडत आहेत. कपाशी पिकावर मर रोग पडत आहे. एकीकडे ही परिस्थिती असतानाही रोजच्या संततधार पावसामुळे खरीप हंगाम धोक्यात आला आहे.
यावर्षी मृग नक्षत्रात सुरुवातीस पावसाने हजेरी लावली. यावर्षी मोठा पाऊस नसला तरी पिके जोमात असल्यामुळे शेतकरी खुश होते. परंतू मागील पंधरा दिवसपासून सुर्यदर्शन नाही. रोज संततधार पाऊस हजेरी लावत आहे. यामुळे जोमात आलेली खरीप पिके पिवळी पडत आहेत. कापूस पिकावर अळीचा प्रादुर्भाव झाला आहे. शेतक-यांनी फवारणी केली पण पावसाची उघडीप नसल्याने फवारणीचा परिणाम झाला नाही. मागील १० ते १५ दिवसांपासून उमरी परिसरात संततधार पाऊस सुरूच आहे. सूर्यदर्शनच नसल्यामुळे पिकांना उन मिळाले नाही. यामुळे खरीपातील सोयाबीन कापूस तूर, ही पिके पिवळी पडत आहेत. रोजच्या पावसामुळे त्यांची मुळे कुजत आहेत. तसेच ढगाळ वातावरण असल्याने किडीचा देखील प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणत वाढला आहे. मात्र संततधार पाऊस असल्याने फवारणी देखील करता येत नाही. गतवर्षी मुबलक पाऊस झाला नसल्याने कपाशीच्या पिकाला मोठा फटका बसला होता. यावर्षी योग्य वेळी पाऊस पडल्याने उमरी परिसरात ५० टक्के क्षेत्रावर कपाशी लागवड झाली आहे. योग्य नियोजन व पोषक वातावरणामुळे कपाशी जोमात आहे. मात्र रोजच्या संततधार पावसामुळे कपाशी पिके पिवळी पडत आहेत. यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे.
रोगाचे प्रमाण वाढल्याने फवारणीया योग्य परिणाम पावसामुळे होत नाही. शेतामध्ये पाणी होऊन पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. रिमझिम पावसामुळे पंधरा दिवस झाले सूर्य सुदर्शन झाले नाही. पिकांवर विविध रोगाचा प्रभाव वाढला आहे.येवढ्या संकटाला सामोरे जात शंकर शिदे यांनी आपल्या शेतात उसाची लागवड केली असून काहीतरी सोयाबीन, कापूस पिका पेक्षा उस लागवड बरी होऊन ज्यास्त उत्पन्न होईल या अपेक्षेत त्यानी खुप जोमाने ऊस लागवड करून कठोर मेहनत घेतली पण दुर्दैव की,अचानक लाईट शाॅट सर्किट्स ने त्याचा हजारो टन ऊस जळुन खाक झाला आहे,गट क्रमांक 159 या गटातील झालेली नुकसान भरपाई प्रशासनाने द्यावेत अस शेतकरी शंकर बापुराव शिंदे रा.हुंडा ग.प.यांनी सागितले आहेत.