उमरी नगरपरिषदने मालमत्ता कर दरात वाढ केल्याने शहरवासीयांत तिव्र नाराजी

abhishek bakkewad
2 Min Read
Spread the love

 

उमरी ता.प्रतिनीधी उद्धव मामडे

उमरी :-नगरपरिषदेने एका खाजगी संस्थेकडून शहरातील मालमत्ता धारकांचे सर्वे करून मोठ्या प्रमाणात महानगरपालिके पलीकडेही जुलमीकर आकारण्यात आला असून हा जुलमीकर मान्य नसल्याचे नागरिक यातून तीव्र प्रतिक्रिया येत आहे. 

          दोन वर्षांपूर्वी तत्कालीन मुख्याधिकारी यांनी नागपूर येथील खाजगी संस्थेमार्फत शहरातील मालमत्ता धारकांचे कर वाढवण्यासाठी संस्थेमार्फत सर्वे केला होता या खाजगी संस्थेने शहरातील प्रत्येक मालमत्ता धारकांचे सर्वे करून मालमत्ताधारकांना एवढा मोठा जुलमीकर लागू करण्यात आला आहे हा कर मुंबई ,नागपूर, पुणे या मोठे शहरा च्यापलीकडेही कर आकारणी आली आहे . या संबंधित उशिराने सर्वांना नोटिसा बजावण्यात आले आहे नोटीसा बघताच शहर वासियांचा राग तीव्र झाला आहे जिल्ह्यात प्रशासनाच्या वतीने कोणत्याही नगरपालिकेत कर वाढ संबंधित कोणतीही आदेश किंवा कारवाई करण्यात आली नाही? केवळ उमरी नगरपालिकेनेच खाजगी संस्थेमार्फत कर वाडीचा फार्मूला अवलंबिला आहे हा कशासाठी? तसेच जिल्ह्यातील इतर नगरपालिकेत केवळ नाममात्र मालमत्ता कर लावलेला आहे पण याच ठिकाणी हट्टास नगरपरिषद प्रशासनाने का केली? असा प्रश्न सामान्य गोरगरीब व शहरवासीयांना पडला आहे लावण्यात आलेले कर हे जुलमी असून हे मान्य नसल्या संताप नागरिक करीत आहे तसेच पूर्वीचाच कर ठेवावा जेणेकरून नगरपालिका निवडणूक झाल्यावर निवडून दिलेले लोकप्रतिनिधींनी ठरवतील कर किती करावे हे त्यांचा अधिकार व त्यांनी ठरवावे अशी ही मागणी शहरवासीयाकडून होत असून या संबंधित जिल्हाधिकाऱ्यांनी तात्काळ लक्ष देऊन लावण्यात आलेले जुलमीकर रद्द करून जुनेच कर ठेवावे अशी मागणी करण्यात आली असून या संबंधित मोठा आंदोलन होण्याची शक्यता असल्याचेही बोलल्या जात आहे.

TAGGED:
Share This Article
error: Content is protected !!