नांदेड जिल्हा प्रतिनिधी:संजीवकुमार गायकवाड
नांदेड :दि.26.ग्रामपंचायत लेखा परिक्षणाचे काम दिल्याचा मोबदला म्हणून तडजोडी अंती 60 हजाराची लाच मागणाऱ्या संतोष हणमंतराव कंदेवार,वय 45 वर्षे,व्यवसाय नौकरी,पद –सहा.संचालक, नेमणूक–स्थानिक निधी लेखा परिक्षा कार्यालय,नांदेड, रा. कृष्णकुंज निवास,पाटबंधारे नगर,तरोडा बु.नांदेड,ता.जि. नांदेड (वर्ग-१) यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ताब्यात घेतले आहे.
यातील तक्रारदार यांच्याकडे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या लेखा परिक्षणाचे कर्तव्य करणारे संतोष हणमंतराव कंदेवार,वय 45 वर्षे, व्यवसाय नौकरी,पद–सहा. संचालक,नेमणूक–स्थानिक निधी लेखा परिक्षा कार्यालय, नांदेड,रा.कृष्णकुंज निवास, पाटबंधारे नगर,तरोडा बु.नांदेड, ता.जि.नांदेड.(वर्ग-१)
हे त्यांचे कार्यालय प्रमुख आहेत. यांनी तक्रारदार यांना नांदेड जिल्हयातील 66 ग्रामपंचायतीचे सन 2021-22 चे लेखापरिक्षण करून अहवाल सादर करण्याचे लेखी आदेश दिले होते.
तक्रारदार यांचेकडे ग्रामपंचायत लेखा परिक्षणाचे काम दिल्याचा मोबदला म्हणून ज्या ग्रामपंचायतीचे खर्च पाच लाख आहे त्यास 1000/- रू प्रति ग्रामपंचायत,ज्या ग्रामपंचायतीचे खर्च दहा लाखापर्यंत आहे त्यास 2000/- रू प्रति ग्रामपंचायत व ज्या ग्रामपंचायतीचे खर्च दहा लाखापेक्षा जास्त आहे, त्यास 10,000/- प्रति ग्रामपंचायत असे एकुण 70,000/- रूपये दयावे लागतील म्हणून तक्रारदार यांच्याकडे मागणी केली होती. नमूद वर प्रमाणे रक्कम ही लाच असल्याची तक्रारदार यांची खात्री झाल्याने त्यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग,नांदेड येथे याबाबत तक्रार दिली.
त्यावरून लाचलुचपत प्रतिबंधक विभाग,नांदेडकडून लाच मागणीची पडताळणी केली असता,13 जुलै रोजी पडताळणी दरम्यान यातील आलोसे यांनी तक्रारदार यांना टोटल सत्तर करून टाक असे म्हणाले,तेव्हा तक्रारदार यांनी काही कमी करा अशी विनंती केल्याने आरोपी यांनी तडजोडीअंती 60,000/- रूपयाची लाच मागणी दोन पंचासमक्ष केली.नमुद प्रकरणात पोलीस स्टेशन शिवाजीनगर, नांदेड,जि.नांदेड येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.आलोसे यांना ताब्यात घेतले असून पुढील कारवाई चालू आहे.
ही कार्यवाही डॉ.राजकुमार शिंदे पोलीस अधीक्षक, अँटी करप्शन ब्युरो,नांदेड परिक्षेत्र,नांदेड.(मोबाईल क्र. 9623999944 ), पर्यवेक्षण अधिकारी श्री राजेंद्र पाटील,पोलीस उप अधीक्षक, अँटी करप्शन ब्युरो, नांदेड. (मोबाईल क्र. – 7350197197 ) यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा तपास अधिकारी श्री. गजानन बोडके, पोलीस निरीक्षक अँटी करप्शन ब्युरो, नांदेड.तसेच सापळा कारवाई पथकाचे पोना/राजेश राठोड, पोकॉ/ईश्वर जाधव, पोकॉ/स. खदीर, चापोह/गजानन राउत,मारोती सोनटक्के, प्रकाश मामुलवार अँटी करप्शन ब्युरो, युनिट नांदेड यांनी पार पाडली आहे.
यासंदर्भात पोलीस अधीक्षक, अँटी करप्शन ब्युरो,नांदेड राजकुमार शिंदे यांच्याशी संपर्क केला असता ते म्हणाले की,मागणीची पडताळणी 13 तारखेला झाली,परंतु आरोपी हुलकावणी देत असल्याने या कार्यवाहीत अडथळे आले होते,काल या संदर्भातील कार्यवाही पूर्ण झाली असल्याचे त्यांनी सांगितले.