मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजनेतील ज्येष्ठ नागरिकांना घेवून नांदेड येथून पहिली रेल्वे 12 ऑक्टोबर रोजी होणार रवाना

abhishek bakkewad
1 Min Read
Spread the love

नांदेड जिल्हा प्रतिनिधी:संजीवकुमार गायकवाड

नांदेड – राज्यातील नागरिकांना देशातील मोठया तीर्थस्थळांना जाऊन मनशांती तसेच आध्यात्मिक पातळी गाठणे सुकर व्हावे,यासाठी राज्यातील सर्व धर्मातील ज्येष्ठ नागरिक जे 60 वर्ष किंवा त्याहून अधिक वयाच्या आहेत त्यांना राज्य आणि देशातील तीर्थक्षेत्रांना मोफत दर्शनाची संधी देण्यासाठी मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना शासनाने सुरु केली आहे.

या योजनेअंतर्गत नांदेड येथून ज्येष्ठ नागरिकांना घेवून पहिली ट्रेन 12 ऑक्टोबर 2024 रोजी निघणार आहे.या योजनेत पात्र लाभार्थ्यांनी निवड यादी समाज कल्याण कार्यालयाच्या सूचना फलकावर लावली आहे.

 

तरी मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजनेअंतर्गत लाभार्थ्यांनी आपले नाव पात्र यादीत आहे किंवा कसे याची खात्री करुन घ्यावी,असे आवाहन समाज कल्याण विभागाचे सहायक आयुक्त शिवानंद मिनगिरे यांनी केले आहे.

Share This Article
error: Content is protected !!