आदिवासी बहुल क्षेत्र जि प शाळा महालपाडा शाळेतील विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक मदतीचे हात पोहचले, हिरण्यगर्भ संस्थेचा स्तुत्य उपक्रम

aia anand
2 Min Read
Spread the love

समाजमाध्यमे सगळीकडे वेगवेगळा परिणाम करत आहेत परंतु याच समाज माध्यमाच्या माध्यमातून आज आमच्या जि प शाळा महालपाडा येथे शैक्षणिक साहित्य वाटप शक्य झालं.

डॉ किरण करेवाड हे माझे मोठे बंधू भायंदर येथे डॉक्टर आहेत. आपण समाजाच देणं लागतो या भावनेतून दरवर्षी हिरण्यगर्भ बहुउद्देशीय संस्था सिरंजनी हिमायतनगर जिल्हा नांदेड या माध्यमातून शैक्षणिक पालकत्व घेऊन अनेक शाळांना शैक्षणिक साहित्य देऊन वंचित असणाऱ्या विद्यार्थ्यांना अध्ययनात सहकार्य करतात.

जि प शाळा महालपाडा

आज डॉ किरण करेवाड डायरेक्टर गुरुकृपा हॉस्पिटल भायंदर, डॉ श्याम पायघन मेडिकल डायरेक्टर गुरुकृपा हॉस्पिटल, श्री संतोष गोरे साहेब नवघर पोलीस स्टेशन , आमचे बंधू फार्मा उद्योजक समाधान वटपलवाड, सतीश वटपलवाड व सहकारी मित्र दिगंबर कदम, संतोष क्षीरसागर व किरण मेद आज शाळेत आले व विद्यार्थ्यांसाठी

*सर्व 106 विद्यार्थ्यांना बूट*
*Drawing books*
*Notebooks*
*पेन पेन्सिल पाउच*
*टिफिन बॉक्स*
*4 इन one पेन*

इ साहित्य सर्व विद्यार्थ्यांना उपलब्ध करून दिले. डॉ किरण करेवाड यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. स्वतःच्या जीवनात शिक्षणाने केलेला बदल समजावून सांगितला. शिक्षण कसे महत्वाचे आहे हे विद्यार्थ्यांना सांगताना प्रेरित केले.

प्रसंगी आदरणीय केंद्रप्रमुख सोनूसिंग पाटील सर, शा व्य समिती अध्यक्ष श्री संतोष सवरा, उपाध्यक्ष सौ जानकीताई सवरा, शिक्षणतज्ज्ञ सदस्य श्री. दिनेशभाऊ सवरा व ग्रामस्थ उपस्थित होते.

शाळेतील बालकांना उपयोगी साहित्य देणाऱ्या बांधवांना तालुक्याची व जिल्ह्याची सांस्कृतिक ओळख असलेली वारली चित्रकलेची फ्रेम शाळेतर्फे देण्यात आली.

कार्यक्रमाचे यशस्वी नियोजन श्री मधुकर वाळिंबे सर व प्रमुख शिक्षक आनंद आनेमवाड यांनी आपल्या सर्व सहकाऱ्यांच्या सहकार्याने केले.

आज मुलांच्या चेहऱ्यावरचा आनंद व आता अनवाणी फिरणार नाहीत हे पाहून आम्हा सर्वांना वाटणारा आनंद याला व्यक्त करायला शब्द नाहीत.

Thank you हिरण्यगर्भ आणि सर्व सहकारी.

*शब्दांकन जि प शाळा महालपाडा*

Share This Article
error: Content is protected !!