नायगाव प्रतिनिधी /अशोक वाघमारे
नायगाव – सहभागी ग्रामीण मूल्यांकन (PRA) हा एक विकासात्मक दृष्टिकोन आहे जो स्थानिक लोकांना त्यांच्या स्वतःच्या राहणीमानाची परिस्थिती,समस्या आणि संभाव्यतेचे विश्लेषण करण्यासाठी सक्रिय भूमिका स्वीकारण्यासाठी सक्षम बनविण्यावर भर देतो. (PRA) हा ग्रामीण जीवन आणि परिस्थितीबद्दल ग्रामीण लोकांकडून आणि त्यांच्यासाठी एक शिकण्याचा दृष्टिकोन आणि पद्धत आहे. (PRA) यामध्ये विश्लेषण नियोजन आणि कृतीमध्ये विस्तारित आहे . ही प्रक्रिया गावकरी आणि स्थानिक अधिकाऱ्यांना जवळून सहभागी करून घेते.यामध्ये विद्यार्थ्यांनी ताकबीड या गावाची माहिती गोळा करून त्या गावाचा नकाशा काढला. त्यामध्ये त्यांनी गावचे रस्ते,शाळा, पाण्याचे स्त्रोत, लागवडीखालील जमीन, सद्यस्थितीमध्ये शेती पिकावर पडणाऱ्या समस्या, व पिकावर किडी व रोग इत्यादी गोष्टी दाखवण्यात आल्या व त्याविषयी विद्यार्थ्यांनी गावकऱ्यांशी चर्चा केली. (PRA) च्या माध्यमातून कृषीदूत शुभम महादेव गायकवाड यांनी उपस्थित गावकऱ्यांचा सन्मान करून गावचा विकासात्मक दृष्टिकोन गावकऱ्यांसमोर मांडला. व कृषिदूत करण गणेशराव कल्याणकर यांनी गावचा आराखडा गावकऱ्यांना समजून सांगितला. सहभागी ग्रामीण मूल्यांकन (PRA) या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थितीत विस्तार अधिकारी महेशजी मुखेडकर साहेब, सरपंच सौ. कल्पना रणजीत पाटील कुरे, उपसरपंच भागनाबाई माधवराव कुरे, माजी सरपंच शिवराज पा. वरवटे, तंटामुक्ती अध्यक्ष शिवशंभु पा. कुरे, शिवाजी माली पा.कुरे, दिगंबर पा वरवटे, मारुती पा. मंडलापुरे,बालाजी मंडलापुरे, बालाजी पा. कुरे, देविदास पा. टेकाळे व सर्व ग्रामस्थ उपस्थित होते.
व कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी वैभव भुसेवार,अमोल हावळे, उदय बागल, पृथ्वीराज देशमुख , सुजल धुमाळे, गोविंद गोदवाड, नकुल चव्हाण, किसन जगताप, ऋषिकेश बोरसे, शशिकांत गुरव,वैभव कांबळे,संकेत बिरमोड,राज भोसले,अर्जुन घुगे,बसवराज गाबुला व अस्तित्व हातागळे यांनी प्रयत्न केले. कार्यक्रमाला गावातील शेतकरी व ग्रामस्थांची व लहान थोरांची उपस्थिती प्रार्थनीय होती. ग्रामीण कृषी कार्यानुभव (RAWE) अंतर्गत संस्थेचे सचिव खासदार प्रा.रवींद्र पाटील चव्हाण साहेब,संस्थेचे संचालक आर.सी. लव्हेकर सर, व प्राचार्य डॉ.आर.जी.नादरे यांच्या मार्गदर्शनाखाली व उपप्राचार्य नागेश घुबे,रावे समन्वयक प्रा.शंकर नागणीकर, रावे कार्यक्रमाधिकारी प्रा.डॉ.एस.ए.शेंडगे सर यांच्या उपस्थितीत सहभागी ग्रामीण मूल्यांकन (PRA) हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यात आला.