नांदेड जिल्हा प्रतिनिधी/ बजरंगसिंह हजारी
नांदेड – दि.०७ ऑक्टोबर : शिक्षण विभाग, जिल्हा परिषद, नांदेड आयोजित जिल्हा शिक्षक पुरस्कार प्रदान सोहळ्यात माहूर येथील जि. प. प्रा.शाळा, सातघरी येथील शिक्षक रणजीत दत्त वर्मा यांना दि.४ ऑक्टोबर रोजी कुसुम सभागृह,नांदेड येथे जिल्हा शिक्षक पुरस्कार सन-२०२४ने महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा खासदार मा. अशोकराव चव्हाण,जिप.मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करणवाल (भा. प्र.से.) यांच्या हस्ते सपत्नीक पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.पुरस्काराचे स्वरूप स्मृती चिन्ह, प्रमाण पत्र व ग्रंथ असे आहे.
वर्मा यांच्या संपूर्ण विद्यार्थी विकासासाठी शैक्षणिक,
सामाजिक,सांस्कृतिक राष्ट्रीय कार्यातील असधारण योगदानाबद्दल तसेच शिक्षण विभागातील समावेशित शिक्षणातील,निवडणूक विभागातील राष्ट्रीय कार्यातील, शैक्षणिक साहित्य निर्माती, शैक्षणिक व्हीडीओ निर्माती, राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद,पुणे आयोजित रंगोत्सवामध्ये विद्यार्थ्यांसह सहभाग, आकर्षक फलक लेखनातून जन जागृती,विवीध आनंद मेळाव्यातून मार्गदर्शन, राज्यभर कला प्रात्यक्षिकांतून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन यासह असंख्य भरीव योगदानासाठी वर्मा यांना गौरविण्यात आले आहे.
यावेळी मंचावर उप मुख्य कार्यकारी अधिकारी मुक्कावार,शिक्षणाधिकारी (प्रा.) डॉ.सविता बिरगे, शिक्षणाधिकारी (मा.) माधव सलगर,शिक्षणाधिकारी (योजना) दिलीप बनसोडे हे उपस्थित होते.
वर्मा यांच्या शैक्षणिक क्षेत्रातील योगदानासाठी मिळालेल्या या पुरस्कारासाठी माहूचे तहसिलदार किशोर यादव,नगराध्यक्ष फिरोज दोसाणी,गटशिक्षणाधिकारी कृष्णा भराडीया,केंद्र प्रमुख संजीव वाठोरे,म.प्रा.शि.प. माहूर ता.अ.शेषेराव पाटील, प्रकाश गोडणारे,नामदेव पतंगे, चंपती गाडगे,म.प्रा.शि.प.राज्याध्यक्ष मधुकर उन्हाळे,जिल्हाध्यक्ष दत्तप्रसाद पांडागळे,संघटक सुधीर श्रृंगारे,मिलींद जाधव, मिलिंद कंधारे,रमेश मुनेश्वर, उत्तम कानिंदे,सुरेश पाटील, जितेंद्र वर्मा,जयश्री सुर्यवंशी (वर्मा),अरविंद जाधव तालुकाध्यक्ष शिक्षक भारती माहूर,परमेश्वर कुसुमवाड, संजय माने यासह अनेकांनी अभिनंदन करत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.