उद्या माहूर येथे भाजपाची तातडीची बैठक

abhishek bakkewad
1 Min Read
Spread the love

आ. केराम यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या महत्वपूर्ण बैठकीत भाजपा पदाधिकाऱ्यांना शशिकांत द्विवेदी, प्रदेश संयोजक,

सहकारिता प्रकोष्ठ भाजपा, छत्तीसगढ हे करणार मार्गदर्शन

माहूर तालुका प्रतिनिधी/विजयसिंह हजारी

माहूर : महाराष्ट्रात होऊ घातलेल्या आगामी विधानसभा निवडणुकीच्याअनुषंगाने किनवट/माहूर विधानसभा मतदारसंघाचे भाजपाचे आमदार भीमराव केराम यांच्या अध्यक्षतेखाली माहूरशहरासह तालुक्यातील तसेच जिल्हा व प्रदेश या वरीष्ठ स्तरावरील सर्व पदाधिकारी यांची बुधवार दि.०९ ऑक्टोबर रोजी शासकीय विश्रामगृह,माहूर येथे दुपारी १२;०० वा.एका महत्वपूर्ण तातडीच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.

बैठकीसाठी प्रमुख मार्गदर्शक म्हणून शशिकांत द्विवेदी प्रदेश संयोजक सहकारिता प्रकोष्ठ भारतीय जनता पार्टी,छत्तीसगढ़ हे लाभणार असून, सुरेशजी लंगडापुरे विस्तारक,किनवट-माहूर विधानसभा यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहेत.   “माहूर शहर,तालुका,जिल्हा कार्यकारिणीतील असलेले सर्व प्रमुख पदाधिकारी,माहूर मंडळातील सर्व बूथ अध्यक्ष, बूथ सचिव,बूथ बि,एल,ओ,२ शक्ति केंद्र प्रमुख तसेच माहूर शहरातील सर्व बूथ अध्यक्ष, बूथ सचिव,बूथ बि,एल,ओ,/२ शक्ती केंद्र प्रमुख,मंडल कार्यकारिणी,जिल्हा पदाधिकारी,प्रदेश कार्यकारिणी सदस्य,महिला मोर्चा तालुका,महिला मोर्चा जिल्हा,सर्व आघाडी अध्यक्ष, सर्व आघाडीचे सरचिटणीस, सर्व प्रकोष्ठ,तालुका अध्यक्ष या पक्ष कार्यकारिणीतील सर्वांनी या अतिशय महत्वपूर्ण आणि बैठकीस उपस्थित राहावे!” असे आवाहन कांतराव भिवाजी घोडेकर तालुका अध्यक्ष भाजपा,माहूर,

पुरुषोत्तम लांडगे शहराध्यक्ष भाजपा,माहूर यांनी केले आहे.

TAGGED:
Share This Article
error: Content is protected !!