निम्न पैनगंगा धरण विरोधी संघर्ष समितीचा प्रशासनाला खणखणीत इशारा
नांदेड जिल्हा प्रतिनिधी/बजरंगसिंह हजारी
नांदेड : निम्न पैनगंगा प्रकल्प (चिमटा धरण) विरोधात ग्रिन ट्युबिनल कोर्ट,पूणे व हायकोर्ट,औरंगाबाद येथे याचिका दाखल असतानाही पाटबंधारे विभाग व भूमी अभिलेख कार्यालयाने शेतीचे सर्वेक्षण व घराच्या मोजणीचे काम हाती घेतले आहे. त्याविरोधात रविवार दिनांक
०६ ऑक्टोबर रोजी निम्न पैनगंगा धरण विरोधी संघर्ष समिती विदर्भ मराठवाडा यांच्यावतीने कापेश्वर येथील कपिलेश्वर मंदिर परिसरात आयोजित बैठकीत “धरणाचे काम थांबवा!…अन्यथा परिणामाला सामोरे जावे लागेल! ” असा खणखणीत इशारा धरण विरोधी समितीच्यावतीने संबंधित प्रशासनाला एकमुखाने देण्यात आला.
दिनांक ०६ ऑक्टोबर रोजी निम्न पैनगंगा धरण विरोधी संघर्ष समिती विदर्भ
-मराठवाडा यांच्यावतीने यवतमाळ जिल्ह्याच्या आर्णी तालुक्यातील कापेश्वर येथे कपिलेश्वर मंदिर परिसरात एका बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.या बैठकीला नांदेड व यवतमाळ जिल्ह्यातील मोठ्या संख्येने शेतकरी,शेतमजूर महिला, पुरुष उपस्थित होते.सुपीक व समृद्ध जमीन आणि बहुमुल्य जंगल बुडवून ९५ गावातील जवळपास दीड लाख लोकांना विस्थापित करणाऱ्या निम्न पैनगंगा प्रकल्पाला गेल्या २७ वर्षांपासून संभावित प्रकल्पबाधीत शेतकरी व गावकरी यांच्या बाजूने प्रतिनिधित्व करत धरण विरोधी संघर्ष समिती तीव्र विरोध करीत आहे.
“जान देंगे जमीन नही”
हा नारा देत पुन्हा निम्न पैनगंगा धरण विरोधी संघर्ष समितीने पैनगंगा प्रकल्पा विरोधात आपले आंदोलन तीव्र करण्याचा या बैठकीच्या निमित्ताने शासनाला इशारा दिला आहे.पाटबंधारे विभागांने प्रकल्पाचे काम सुरू करण्याचा प्रयत्न केल्यास त्यांना जशास तसे उत्तर देऊ असा इशारा धरण विरोधी संघर्ष समितीने यावेळी दिला.
यावेळी समितीचे अध्यक्ष प्रल्हादराव पाटील जगताप, यवतमाळ जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष मुबारक तंवर, विजय पाटील राऊत,ॲड.
बालाजी येरावार,प्रल्हादराव गावंडे,बाबूभाई फारुकी, बंडूसिंग नाईक,कॉम्रेड अर्जुन आडे,जितेंद्र मोघे,मनोज कीर्तने,रितेश परचाके,डॉ. सुप्रिया गावंडे,डॉ.प्रदीप राऊत, शंकर सिडाम यांनी आपल्या भाषणातून धरण विरोधी संघर्ष समितीची भविष्यातील आंदोलनाची दिशा या बैठकीतून स्पष्ट केली.
प्रकाश राठोड,डॉ.बाबाराव डाखोरे,बंटी पाटील जोमदे, जयराम मिश्रा,भगवतीप्रसाद तितरे,निलेश कुमरे,गजानन डाखोरे,आकाश वाघमारे,
विजय समगिर,मंगेश सोयाम, मारोती ठाकरे,अविनाश नेमाडे,गुलाब मेश्राम,बालाजी ठाकरे,महेंद्र जैस्वाल,विजय पाझारे,राज गावंडे,उत्तम कांबळे,उत्तम मिरासे,राजु राउत,कैलास उकले,सुरेश महल्ले व बुडीत क्षेत्रातील अनेक सरपंच,उपसरपंचासह, शेतकरी व शेतमजूर,युवक व पुरुष,महिला मोठ्या संख्येने
या बैठकीला उपस्थित होते.
या बैठकस्थळी सावळी सदोबा पोलीस चौकीचे ठाणेदार संदिप बारिंगे व त्यांच्या अधिनस्त पोलिस कर्मचाऱ्यांनी यावेळी चोख पोलीस बंदोबस्त ठेवला होता.