मुद्रांक विक्रेता व दस्त लेखनिक संघटना,महाराष्ट्र राज्य

abhishek bakkewad
1 Min Read
Spread the love

मराठवाडा विभाग उपाध्यक्षपदी जगताप तर माहूर तालुका अध्यक्षपदी जाधव यांची नियुक्ती झाल्याबद्दल ह्रदय सत्कार

माहूर तालुका प्रतिनिधी/विजयसिंह हजारी

माहूर – दि. ०९ऑ: मुद्रांक विक्रेता व दस्त लेखनिक संघटना महाराष्ट्र राज्य कार्यकारिणीच्या मराठवाडा विभाग उपाध्यक्षपदी माहूर येथील मुद्रांक विक्रेता अमृत श्रीरंग जगताप यांची तर माहूर तालुका अध्यक्षपदी संजय जाधव यांची नियुक्ती करण्यात आली आहे.नवनियुक्त सर्व पदाधिकाऱ्यांचा मंगळवार दि. ०८ ऑक्टोबर रोजी दुय्यम निबंधक श्रेणी-१ कार्यालय, माहूर येथे दुय्यम निबंधक अधिकारी लता तलांडे यांच्या हस्ते शॉल,पुष्पहार व पुष्पगुच्छ देऊन ह्रदय सत्कार करण्यात आला.

माहूर येथील अमृत जगताप हे अनेक वर्षांपासून शासन मान्य मुद्रांक विक्रीचा व्यवसाय करतात.जगताप हे याआधी मुद्रांक विक्रेता व दस्त लेखनिक संघटनेचे माहूर तालुका अध्यक्ष असताना त्यांच्या कार्याची दखल घेत संघटनेचे राज्य अध्यक्ष शंकर कृष्णा भिसे यांनी त्यांची पदोन्नती करत मुद्रांक विक्रेता व दस्त लेखनिक संघटना महाराष्ट्र राज्य मराठवाडा विभाग उपाध्यक्षपदी नियुक्ती केली आहे.दिनांक ०६ ऑक्टोबर रोजी नांदेड येथे एका सत्कार समारंभात त्यांना हे नियुक्तीपत्र देण्यात आले.

तसेच मुद्रांक विक्रेता माहूर तालुका अध्यक्षपदी संजय जाधव तर सचिवपदी श्रीमती प्रतिभाताई पाटील व कोषाध्यक्ष (खजिनदार) म्हणून अरविंद पवार यांची संघटनेचे नांदेड जिल्हाध्यक्ष सुभाष चावरे यांनी नियुक्ती केली आहे.

नवनियुक्त सर्व पदाधिकाऱ्यांचे तालुका प्रशासनातील सर्व अधिकारी,कर्मचारी व मित्र परिवाराकडून अभिनंदन करण्यात येत असून,पुढील वाटचालीसाठी शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

TAGGED:
Share This Article
error: Content is protected !!