सन 2024 चा समाज भुषण पुरस्कार हिमायतनगर तालुक्यातील जेष्ठ समाजसेवक दगडूजी काईतवाड यांना देण्यात येणार आहे…
हिमायतनगर प्रतिनिधी/बाबाराव जरगेवाड
हिमायतनगर – गोल्ला गोलेवार यादव महासंघाच्या वतीने दरवर्षी घेण्यात येणारा समाज मेळावा, समाज भूषण पुरस्कार, गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार व समाज भुषण पुरस्कार कार्यक्रम 11 ऑक्टोबर 2024 रोजी 12 वाजता राष्ट्रसंत गुरूवर्य श्री साईनाथ महाराज बितनाळकर यांचे आनंद दत्त धाम आश्रम श्रीक्षेत्र माहूर गढ येथे आयोजीत केला आहे,सन 2023-24 या वर्षीचा समाज भूषण पुरस्कार जे सर्वोत्कृष्ट मानल्या जातो, समाजासाठी सतत कार्य करणाऱ्या ज्येष्ठ समाज सेवकास दिला जातो. तो समाज भूषण पुरस्कार या कार्यक्रमात दिला जाणार आहे.
तरी या कार्यक्रमास सर्व समाज बांधवानी बहुसंख्येने उपस्थित रहावे असे आवाहन प्रदेश अध्यक्ष युवक महाराष्ट्र, तथा जिल्हा अध्यक्ष युवक नांदेड अभिषेकजी बकेवाड,हिमायनगर तालुका अध्यक्ष श्री सुभाषराव शिलेवाड, ओबीसी ता.अध्यक्ष जरगेवाड बाबाराव,उपाध्यक्ष श्याम जक्कलवाड, उपाध्यक्ष राजेश्वर चिकनेपवाड, विभागीय उपाध्यक्ष पर्वतावर काईतवाड,संटी कपलवाड, कार्याध्यक्ष नारायण कोरेवाड,संघटक प्रकाश भदेवाड,कोषाध्यक्ष नागोराव मेडेवाड, सहसचिव दत्तात्रय आबेपवाड, साईनाथ निम्मेवाड,सल्लागार गंगाधर बासेवाड, दत्ता बलपेलवाड प्रसिद्ध प्रमुख सुरज चितलवाड, युवा अध्यक्ष, साईनाथ कपलवाड, उपाध्यक्ष प्रकाश सोकलवाड, कार्याध्यक्ष कृष्ण आबेपवाड, गजानन रेनलेवाड, सर्व तालुका पदाधिकारी गोल्ला गोलेवार यादव महासंघाच्या वतीने करण्यात आले आहे.