लोहा येथे भारतरत्न, डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे थाटात अनावरण; आ.शामसुंदर शिंदे व भिक्खू संघाची प्रमुख उपस्थिती

abhishek bakkewad
2 Min Read
Spread the love

 

नांदेड जिल्हा प्रतिनिधी:संजीवकुमार गायकवाड

नांदेड – जिल्ह्यातील लोहा तालुका येथे युगपुरुष भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार,(सिम्बॉल ऑफ नॉलेज )बोधिसत्व,परमपूज्य,भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरन थाटात संपन्न झाले.

डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळा अनावर प्रसंगापूर्वी जगाला शांतीचा संदेश देणारे महाकारुणिक तथागत गौतम बुद्ध यांच्या प्रतिमेचे भिक्खू संघाच्या वतीने पुज्यन करण्यात आले.पंचशिल ध्वजारोहण प्राचार्य खेमोधम महास्थवीर यांच्या हस्ते करण्यात आले. आहे.

 

निळ्या ध्वजाचे ध्वजारोहण पि.एम.वाघमारे यांच्या हस्ते करण्यात आले, पुतळयाचे उद् घाटन लोहा विधानसभेचे आ.शामसुंदर शिंदे पाटील,डॉ बाबासाहेब आंबेडकर पुतळा समितीचे अध्यक्ष उपा.पुष्पलता कापुरे व भिक्खू संघाचे प्रमुख प्राचार्य खेमोधम महास्थवीर यांच्या हस्ते करण्यात आले.या वेळी सर्व सामाजिक कार्यकर्ते व भिक्खू संघाचे पंचशील पट्टी निळी शाल देऊन कापुरे यांनी सत्कार केला.

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपा पुष्पलता कापुरे यांनी केले. प्रास्ताविक पर बोलताना त्या म्हणाल्या की स्त्री सुध्दा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा निर्माण करु शकते हे दाखवून दिले आहे.पुतळा निर्माण करते वेळी किती अडचणी येतात.याआडचणी दुर करून पुतळा निर्माण झाला आज पुतळ्याचे अनावरण झाले याचा खुप मला मनस्वी आनंद झाला आहे.ज्यानी मला प्रत्यक्ष अप्रत्यक्ष आर्थिक मदत केले आहे.त्यांचे ऋण विसरू शकत नाही.

 

यावेळी उपस्थित बांधवांचे आभार मानून त्यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. सामाजिक कार्यकर्त्या

सौ.आशाताई शिंदे व आमदार शामसुंदर शिंदे पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त करताना लोहा मंतदार संघातील विकास कामांचा आढावा या सभेत मांडण्याचा प्रयत्न केला.

 

यावेळी मंचावर उपस्थित भिक्खू संघ प्राचार्य खेमोधम महास्थीवीर,प्रा सत्यपाल महस्थवीर,भंते पंययाबोधी थेरो,भते रेवतबौधी, आणि भिक्खूसंघ,नांदेड जिल्हा कॉंग्रेस कमिटीचे अध्यक्ष बि आर कदम,एकनाथराव मोरे संनदीधिकारी,जिल्हाध्यक्ष डॉ गंगाधरराव सोनकांबळे, भारतीय बौद्ध महासभेचे अध्यक्ष पि.एम.वाघमारे,लोहा तालुका अध्यक्ष शरद पवार, संतोष काबळे, जिल्हाउपाध्यक्ष किशनराव रावणगावकर, जिल्हा उपाध्यक्ष अनिल उबाळे, डि पी गायकवाड,डि के कांबळे,शाहिर गौतम पवार त्यांचा संच भारतीय बौद्ध महासभेचे लोहा कार्यकरणी व इतर कार्यकर्ते उपस्थित होते.

Share This Article
error: Content is protected !!