माहूरकरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी निकाली
नांदेड जिल्हा प्रतिनिधी/बजरंगसिंह हजारी
नांदेड : राज्याचे उपमुख्यमंत्री, गृहमंत्री तथा जलसंपदामंत्री देवेंद्र फडवणीस यांच्या हस्ते विडीओ कॉन्फरंसीगद्वारे
विकासपुरूष अशी भक्कम ओळख प्राप्त झालेले किनवट / माहूर विधानसभेचे लोकप्रिय आमदार भीमराव केराम यांच्या सार्थक प्रयत्नाने प्राप्त झालेल्या धनोडा (माहूर) येथील पैनगंगा नदीवर तब्बल २२२ कोटी रुपये खर्चून बांधण्यात येणाऱ्या उच्च पातळी बंधाऱ्याच्या कामाचा
भूमीपूजन सोहळा उद्या
सोमवार, दि. १४ ऑक्टोबर रोजी सकाळी ११.०० वा.
आ. केराम यांच्या अध्यक्षतेखाली मान्यवरांच्या उपस्थितीत भाजपा, शिवसेना ( एकनाथ शिंदे) व राष्ट्रवादी कॉंग्रेस (अजित पवार) किनवट/माहूरच्या आयोजनात संपन्न होणार असून, याव्यतिरिक्त तालुक्यातील अनेक ठिकाणच्या तब्बल ४० कोटींच्या विकास कामांचे भूमीपूजन यावेळी आ.केराम यांच्या हस्ते संपन्न होणार आहे.
१९६०च्या मराठवाडा मुक्ती संग्रामाच्या लढ्यानंतर निजामशाही च्या जुलमी राजवटीतून मुक्त झाल्यावरही जवळपास ६५ वर्षांपासून माहूरकरांच्या पिण्याच्या पाण्याची तहान “उशाला गंगा अन् घशाला कोरड ” अशी उपहासात्मक होती.दरम्यान, मध्यंतरी माहूर पासून ५ किलोमीटर अंतरावरील मराठवाडा व विदर्भाच्या भौगोलिक सीमा छेदत माहूर तालुक्यातील केरोळी-शेकापूर तर महागाव तालुक्यातील धनोडा या दोन्ही च्या मध्यभागातून वाहणाऱ्या पैनगंगा नदीवरुन सद्यस्थितीत कोल्हापूरी बंधाऱ्याच्या माध्यमातून माहूरकरांची कशीबशी तहान भागविण्याचे काम नगरपंचायतीच्या पाणीपुरवठा योजनेतून सुरू होते.धनोडा येथे कोल्हापूरी बंधाऱ्याच्या खालून वरुन बहुतांश पाणी वाहून जात असताना उरलेल्या अडविलेल्या तोकड्या जलसाठ्यातून नगरपंचायतीच्या पाणीपुरवठा योजनेद्वारे आजपर्यंत रडतपडत परंतु नियमित माहूरला नळ योजनेद्वारे पाणी पुरवठा होत आहे.
परंतु, प्रसिद्ध तिर्थक्षेत्र हे तालुका निर्मिती नंतर लोकसंख्येच्या दृष्टीने झपाट्याने वाढत आहे.तालुक्याचे भाजपाचे आमदार भीमराव केराम यांच्या विकास प्रिय दृष्टीकोनामुळे त्यांनी या भागातील अपुऱ्या विविध पायाभूत व मुलभूत सोईसुविधे अलिकडे शासनाचे लक्ष वेधून कोट्यवधी ची विकासकामांची जणू गंगा या किनवट व माहूर तालुक्याकडे वळविली आहे.त्याचाच एक भाग म्हणून धनोडा येथील पैनगंगा नदी पात्रात आता तब्बल २२२कोटी रुपये खर्चून बांधण्यात येणाऱ्या उच्च पातळी बंधाऱ्यास त्यांच्या सार्थक प्रयत्नाने मंजुरी मिळाली असून, त्या कामाचा भूमीपूजन सोहळा उद्या सोमवारी १४ रोजी सकाळी ११ वाजता संपन्न होत आहे.
या उच्च पातळी बंधाऱ्याच्या कामामुळे माहूरगडावरील भाविकांसह,शहरातील नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आता कायमस्वरूपी निकाली निघणार असल्याने भाविकांसह नागरिकांमधून समाधानासह आमदार भीमराव केराम यांचे आभार मानले जात आहे.
*भारतीय जनता पार्टी,तालुका माहूर च्या वतीने आयोजित उद्या दिनांक 14/10/2024 रोज सोमवार वेळ : दुपारी 12.30 वाजे पासुन… माहूर तालुक्यातील विविध ठिकाणी होणारे भूमीपूजन*
01. वडसा ते आसोली फाटा रा.म.मा.161-अ रस्त्याची पुलमोऱ्यासह सुधारणा करणे, (इजिमा-4) किमी 2/100 ते 7/00 ता.माहुर जि. नांदेड
350 लक्ष
02. लखमापुर मुरली आष्टा मच्छिंद्रपार्डी वाई गोकुळ हरडफ सावरखेड बोंडगव्हाण रस्त्याची पुलमोऱ्यासह सुधारणा करणे (प्रजिमा-135) किमी 8/500 ते 10/700 ता.माहुर
350 लक्ष
03. लखमापूर ते टाकळी रस्त्याची पुलमोऱ्यासह सुधारणा करणे (ग्रामा-5) किमी 1/500 ते 5/00 ता. माहुर जि. नांदेड
350 लक्ष
04. नेर टाकळी वडसा गोकुळ मदनापुर सावरखेड वसरामनाईक तांडा सातीगुडा रामपुर रस्त्यावर पुलांचे पोचमार्गासह बांधकाम करणे (रा.मा.-463) किमी 2/900 व 12/200 ता. माहुर
350 लक्ष
05. नेर टाकळी वडसा गोकुळ मदनापुर सावरखेड वसरामनाईक तांडा सातीगुडा रामपुर रस्त्यावर पुलांचे पोचमार्गासह बांधकाम करणे (रा.मा.-463) किमी 0/250 व 0/500 ता.माहुर
350 लक्ष
06. नांदेड जिल्ह्यातील श्री क्षेत्र माहुरगड येथील श्री दत्तप्रभु मंदिर, दत्त शिखर परीसरामध्ये प्रसादालयाचे बांधकाम करणे.
342 लक्ष
07. नांदेड जिल्ह्यातील श्री क्षेत्र माहुरगड येथील श्री दत्तप्रभु मंदिर, दत्तशिखर परीसराचा विकास करणे (प्रसादालय बांधकाम)
300 लक्ष
08. दत्तशिखर मंदिर ते दत्तशिखर पायथा प्रजीमा 134 रस्त्याची किमी-16/500 ते किमी-17/150 ची सुधारणा करणे.
500 लक्ष
09. नांदेड जिल्ह्यातील माहुर तालुक्यातील दत्तमांजरी शेख फरीद वझरा मांडवा वानोळा मेंडकी निचपुर (प्र.जि.मा.-5) कि.मी 5/600 ते 11/500 मधील रस्त्याची सुधारणा करणे
500 लक्ष
10. माहुर रेणुकादेवी दत्तशिखर मांडवा वानोळा मेंडकी मुंगशी निचपुर राजगड रस्ता प्रजीमा-5 ची किमी 20/000 ते 21/000 मध्ये रस्त्याची सुधारणा करणे ता. माहुर जि. नांदेड
325 लक्ष
11. माहुर रेणुकादेवी दत्तशिखर मांडवा वानोळा मेंडकी मुंगशी निचपुर राजगड रस्ता प्रजीमा-5ची किमी 21/000 ते 23/000 मध्ये रस्त्याची सुधारणा करणे ता. माहुर जि. नांदेड
250 लक्ष.
याप्रमाणे आहेत.