नांदेड जिल्हा प्रतिनिधी/
नांदेड – माहूर येथे गोल्ला गोलेवार यादव महासंघाच्या वतीने दर वर्षी घेण्यात येणारा गुणवंतांचा गौरव व समाजभूषण पुरस्कार कार्यक्रम आनंद दत्त धाम आश्रम श्रीक्षेत्र माहूर येथे मोठ्या थाटामाटात, हजारो समाज बांधवांच्या उपस्थित संपन्न झाला.
सदर मेळाव्यात गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार, नव नियुक्त कर्मचारी अधिकारी यांचा विशेष सन्मान करण्यात आला. यंदाचा विशेष समाज भूषण पुरस्कार संपूर्ण देशात स्वच्छता अभियान राबवून शांततेचा संदेश देणारे, सर्व समाजांच्या तळागाळातील लोकांपर्यंत जावून समाज प्रबोधन करणारे, आनंद दत्त धाम आश्रम माहूर गड येथे दर रोज अविरत अन्नदान करणारे राष्ट्रसंत सद्गुरू श्री द.भ.प. साईनाथ महाराज वसमतकर, बितनाळकर यांना प्रदान करण्यात आला, तसेच समाजासाठी सेवेचे योगदान देणाऱ्या ज्येष्ठ समाज सेवकांचा दरवर्षी देण्यात येणारा समाज भूषण पुरस्कार ज्येष्ठ समाज सेवक श्री दिगंबरराव बाबाराव करेवाड कोल्हारी ता. किनवट व ज्येष्ठ समाज सेवक श्री दगडूजी संतोबा काईतवाड रा. बोरगडी ता. हिमायतनगर यांना प्रदान करण्यात आला. व तसेच नायगाव पं.स.चे सेवानिवृत्त शिक्षण विस्तार अधिकारी श्री आर.एम.चिकलवाड सरांचा सेवानिवृत्ती निमित्त समाजातर्फे सन्मान करण्यात आले आहे.
या कार्यक्रमात ज्येष्ठ साहित्यिक श्री देविदासजीं फुलारी यांचे विद्यार्थी व समाज बांधवांसाठी शैक्षणिक व सामाजिक विषयांवर उत्कृष्ट मार्गदर्शन लाभले. व तसेच राष्ट्रसंत श्री साईनाथ महाराज यांनी समाज बांधवांनी एकत्र राहून समाजासाठी निष्ठेने कार्य केले पाहिजे, समाजाच्या पदाधिकाऱ्यांनी सामाजिक भावना ठेवून समाजासाठी प्रामाणिक काम केले पाहिजे, समाज कार्य करीत असताना राजकीय हेतू ठेवून समाजाची दिशाभूल करण्याचा प्रयत्न समाज प्रमुखांनी करू नये. समाजासाठी एकनिष्ठ राहून प्रामाणिक कार्य करणाऱ्या समाज बांधवांना माझा खंबीर पाठींबा कायम राहील, माझा सदैव आशीर्वाद राहील, परंतु समाजासाठी अप्रामाणिक वागून दिशाभूल करणाऱ्यांच्या पाठीशी मी कधीही उभा राहणार नाही, असा सज्जड इशारा देवून राष्ट्रसंत श्री साईनाथ महाराज यांनी समाजास संबोधित केले.
यावेळी समाज भूषण श्री दिगंबरराव करेवाड यांनी सर्व समाज बांधवानी एकत्र कार्य करावे, समाजाचे गट ताटात विभाजन करू नये अशी अपेक्षा व्यक्त केली. यावेळी उप शिक्षण अधिकारी श्री गजानन आक्कमवाड यांनीही विद्यार्थ्यांना व उपस्थित समाज बांधवांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाच्या दुसऱ्या सत्रात, समाजातील व्यक्तींना कोणत्याही प्रकारचे व्यसन राहू नये अथवा जडू नये म्हणून गोल्ला गोलेवार यादव महासंघाचे प्रांत अध्यक्ष श्री भुमन्ना आक्केमवाड भोसीकर यांचे हस्ते व्यसन रुपी रावणाचे दहन करून व्यसन मुक्तीचा संदेश देण्यात आला.

या कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री पी. पी. फांजेवाड हे होते तर प्रमुख अतिथी व वक्ते म्हणून जेष्ठ साहित्यिक श्री देविदास फुलारी हे होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रांत महासचिव श्री एस. टी. गालेवाड यांनी केले तर कार्यक्रमाचे उत्कृष्ट सूत्रसंचलन श्री पी.जी. रूद्रवाड सर व श्री परशूराम आक्कमवाड सर यांनी केले. या कार्यक्रमाच्या नियोजन साठी श्री भाऊसाहेब पा. हडसनीकर व त्यांची टीम, श्री माधवराव वटपलवाड सर, जिल्हा सचिव श्री अशोकरावं कासराळीकर, श्री देवीदास आक्कमवाड सर, श्री बालाजीराव शेणेवाड सर, जिल्हा कोषाध्यक्ष श्री तुकाराम कैलवाड, जिल्हा कार्याध्यक्ष श्री रमेशराव रामपुरवार, प्रदेश अध्यक्ष युवक महाराष्ट्र राष्ट्रीय यादव महासभा दिल्ली.तथा जिल्हाध्यक्ष युवक अभिषेकजी बकेवाड, श्री विठ्ठलराव जकिलवाड, श्री गोविंदराव भुसलवाड,मुदखेड ता. अध्यक्ष श्री रामजी गवंडेवाड आदींनी परिश्रम घेतले व तसेच गोदावरी जंगीलवाड यांनी सुंदर रांगोळी काढून आपल्या कलेचा आविष्कार सादर केला.

यावेळी मार्गदर्शक म्हैशाचे उद्योजक श्री लालुजी यादव श्री जी.एन. सल्लावार, श्री प्रकाशराव करेवाड, श्री आनंदराव गादीलवाड, श्री तुकाराम रामनबैनवाड सर, श्री परबतराव काईतवाड, अर्धापूर ता. अध्यक्ष श्री गंगाधरराव बक्केवाड, हिमायतनगर ता. अध्यक्ष श्री सुभाषराव सिलेवाड, उमरी ता. अध्यक्ष श्री गणेशराव आनेमवाड, भोकर ता. अध्यक्ष श्री संतोष आक्केमवाड, किनवट प. स. चें उपसभापती श्री कपिल करेवाड, ओबीसी ता.अध्यक्ष बाबाराव जरगेवाड,कृषी उत्पन्न बाजार समिती किनवटचे संचालक श्री रमेश बोड्डेवाड, श्री श्यामसेठ जक्कलवड, मुख्याध्यापक श्री रमेश राऊलवार सर, श्री देविदास राऊलवार सर, श्री गोविंदराव दुबेवाड शेंबोलीकर, श्री शिवाजीराव बोटेवाड, श्री बाबाराव जरगेवाड,मा.सरपंच दैवन्ना शैनेवाड,श्री व्यंकटराव आक्कमवाड, श्री.नारायण कोरेवाड,श्री.नागोराव मेडेवाड,श्री.साईनाथ निम्मेवाड, प्रकाश सोकलवाड,श्री मारोतराव झंपलवाड, श्री दत्तात्रय जकीलवाड सर, श्री प्रकाशराव नेरलेवाड साहेब,श्री दत्तात्रय जंगिलवाड साहेब, श्री रामदास शिंगेवाड सर, श्री संभाजीराव बल्फेवाड सर,सौ. गिरीजाबाई संभाजीराव बल्फेवाड, सुभेदार श्री विकास बल्फेवाड साहेब, श्री बाबुराव नरन्ना रूद्रवाड सर, सर,प्रा.कार्तिक मुद्देलवार सर, श्री सदाशिव पालदेवाड सर, श्री.परमेश्वर वटपलवाड, श्री.बालाजी वटपलवाड, श्री नागोराव जंगिलवाड, श्री बळीराम बक्केवाड,श्री.रावण गुरुजी चिखलवाड,श्री.गंगाधर सिध्देवाड,श्री गणपती लालमवाड,श्री नामदेव आक्कमवाड,श्री परमेश्वर जकीलवाड, श्री पोतन्ना आक्कमवाड, श्री गोविंद लालमवाड, श्री परसराम बक्केवाड,श्री शंकर आक्कमवाड, श्री गंगाधर आक्कमवाड, सौ.गोदावरीबाई पेंटू रुद्रवाड, सौ. छाया बाई तुकाराम रामनबैनवाड, सौ.लक्ष्मीबाई नागोराव जंगिलवाड, सौ.महानंदाबाई दिगंबर नागधरे, सौ.पंचफुलाबाई गंगाधरराव बक्केवाड,श्री.बाबु करेवाड,श्री.राजेश चिकनेपवाड,श्री.श्रीकांत राहुलवाड, श्री.मधूकर मिरकगुलवाड,पोतन्ना करेवाड, सरपंच श्री.सुधाकर काईतवाड, PSI श्री.दत्ता काईतवाड,श्री. शंकर राहुलवाड,श्री.काशिनाथ घोसलवाड,श्री.अरमन मारोती शैनेवाड, प्राध्यापकश्री.पुंडलिक चितलवाड सर, श्री.पोपुलवाड सर,श्री.जनार्दन कपलवाड,श्री.गणेश घोसलवाड,श्री.सदाशिव घोसलवाड,श्री.साईनाथ आबेपवाड, श्री.प्रभाकर पोटेवाड, श्री अवधूत घोसलवाड,श्री.बालाजी म्याकलवाड, सुरेश शैनेवाड,श्री.ज्ञानेश्वर काईतवाड,श्री.अशोक येलावनी, नरगी अशेन्ना व समस्त समाज बांधव उपस्थित होते.
