नांदेड प्रतिनिधी/अशोक वाघमारे
नायगाव तालुक्यातील मौजे हुस्सा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शालेय व्यवस्थापन समितीवर सर्वानुमते अध्यक्षपदी श्री बालाजी आनंदराव हंबर्डे तर उपाध्यक्षपदी प्रदीप गणपतराव वाघमारे यांची निवड 14 /10 /2024 रोजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मोजे हुस्सा येथे करण्यात आली आहे.
सदर निवड हे शालेय व्यवस्थापन समितीवर करण्यात आली असून ही निवड बिनविरोध करण्यात आली आहे. आणि निवडी दरम्यान गावातील पालक वर्ग मोठ्या प्रमाणात उपस्थित राहून गावातील एकमताने बालाजी पाटील हंबर्डे यांची पुन्हा एकदा शालेय व्यवस्थापन समितीवर अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे तर उपाध्यक्षपदी प्रदीप गणपत वाघमारे यांची निवड करण्यात आली आहे. एकूणच मागील काळामध्ये बालाजी आनंदराव पाटील हंबर्डे यांनी अतिशय निस्वार्थपणे व अविरतपणे शाळेमध्ये सुनियोजित व्यवस्थापन केले असून त्यांना मागील काळातील चांगलाच अनुभव असल्याचे देखील गावकऱ्याकडून सांगण्यात आले आहे त्यांच्या अनुभवाप्रती पुन्हा एकदा बालाजी हंबर्डे यांना संधी देण्यात आली आहे. तर उपाध्यक्षपदी नवनिर्वाचित प्रदीप वाघमारे यांची निवड करण्यात आली आहे सदर निवडी दरम्यान श्री बालाजी हंबर्डे व प्रदीप वाघमारे यांचं उपस्थित नागरिकाकडून व शाळेतील कर्मचाऱ्याकडून स्वागत करण्यात आले व पुढील कार्यासाठी शुभेच्छा देखील देण्यात आले आहे. दरम्यान गावातील सरपंच प्रतिनिधी मा श्री रमेश रामराव माली पाटील, जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक श्री नारे सर, श्री बंडेवार सर, श्री कदम सर, गावातील धोंडीबा रावसाहेब हंबर्डे, नंदकिशोर हंबर्डे, संदीप भगवान गायकवाड, उणकेश्वर हंबर्डे, बालाजी अर्जुन हंबर्डे, रामजी वाघमारे, माधव गायकवाड, यासह गावातील नागरिक उपस्थित होते.