धनोडा पैनगंगेवरील २२२ कोटींच्या उच्च पातळी बंधाऱ्याचे व माहुर तालुक्यातील विविध ठिकाणच्या ४० कोटींच्या विकास कामांचे आ. केराम यांच्या हस्ते भूमीपूजन संपन्न

abhishek bakkewad
3 Min Read
Spread the love

 

नांदेड जिल्हा प्रतिनिधी/बजरंगसिंह हजारी

नांदेड : धनोडा येथील पैनगंगा नदीवर तब्बल २२२ कोटी रुपये खर्चून बांधण्यात येणाऱ्या उच्च पातळी बंधाऱ्याच्या कामाचे व माहुर तालुक्यातील ११ ठिकाणच्या ४०कोटींच्या विविध विकास कामांचे भूमीपूजन आज

सोमवार, दि. १४ ऑक्टोबर रोजी सकाळी ११.०० वा.पासून दुपारी उशीरापर्यंत

आ.भीमराव केराम यांच्या हस्ते तथा भाजपा, शिवसेना ( एकनाथ शिंदे) व राष्ट्रवादी कॉंग्रेस (अजित पवार) किनवट/माहूर विधानसभा यांच्या आयोजनातून उत्साहात संपन्न झाले.

    आमदार भीमराव केराम यांच्या विकासवादी दृष्टीकोनामुळे त्यांनी या भागातील अपुऱ्या विविध पायाभूत व मुलभूत सोईसुविधे अलिकडे शासनाचे लक्ष वेधून कोट्यवधी ची विकासकामांची जणू गंगा या किनवट व माहूर तालुक्याकडे वळविली आहे.

त्याचाच एक भाग म्हणून आज सोमवारी सकाळी ११ वाजता धनोडा येथील पैनगंगा नदी पात्रात २२२कोटी रुपये खर्चून बांधण्यात येणाऱ्या उच्च पातळी बंधाऱ्याचे व माहूर तालुक्यातील ११ विविध ठिकाणी ४० कोटींच्या विकास कामांचे भूमीपूजन आमदार भीमराव केराम यांच्या हस्ते अनेक मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत मोठ्या हर्षोल्हासात आणि धुमधडाक्यात संपन्न झाले. 

 या उच्च पातळी बंधाऱ्याच्या कामामुळे परिसरातील शेतकऱ्यांच्या शेतीसह माहूरगडावरील भाविकांसह,शहरातील नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आता कायमस्वरूपी निकाली निघणार असल्याने भाविकांसह नागरिकांमधून समाधानासह आमदार भीमराव केराम यांचे आभार मानले जात आहे.

दरम्यान, दुपारनंतर आमदार भीमराव केराम यांच्या हस्ते तालुक्यातील ४० कोटींच्या विविध ११ विकास कामांचे भूमीपूजन देखील संपन्न झाले. ते पुढीलप्रमाणे आहेत.. वडसा ते आसोली फाटा रा.म.मा.161-अ रस्त्याची पुलमोऱ्यासह सुधारणा करणे, (इजिमा-4) किमी 2/100 ते 7/00 -350 लक्ष, लखमापुर मुरली आष्टा मच्छिंद्रपार्डी वाई गोकुळ हरडफ सावरखेड बोंडगव्हाण रस्त्याची पुलमोऱ्यासह सुधारणा करणे (प्रजिमा-135) किमी 8/500 ते 10/700- 350 लक्ष,लखमापूर ते टाकळी रस्त्याची पुलमोऱ्यासह सुधारणा करणे (ग्रामा-5) किमी 1/500 ते 5/00-

350 लक्ष,नेर टाकळी वडसा गोकुळ मदनापुर सावरखेड वसरामनाईक तांडा सातीगुडा रामपुर रस्त्यावर पुलांचे पोचमार्गासह बांधकाम करणे (रा.मा.-463) किमी 2/900 व 12/200-350 लक्ष, नेर टाकळी वडसा गोकुळ मदनापुर सावरखेड वसरामनाईक तांडा सातीगुडा रामपुर रस्त्यावर पुलांचे पोचमार्गासह बांधकाम करणे (रा.मा.-463) किमी 0/250 व 0/500-350 लक्ष,माहुर येथील श्री दत्तप्रभु मंदिर, दत्त शिखर परीसरामध्ये प्रसादालयाचे बांधकाम करणे.

-342 लक्ष, माहूर येथील श्री दत्तप्रभु मंदिर, दत्तशिखर परीसराचा विकास करणे (प्रसादालय बांधकाम)-300 लक्ष,दत्तशिखर मंदिर ते दत्तशिखर पायथा प्रजीमा 134 रस्त्याची किमी-16/500 ते किमी-17/150 ची सुधारणा करणे-500 लक्ष,दत्तमांजरी शेख फरीद वझरा मांडवा वानोळा मेंडकी निचपुर (प्र.जि.मा.-5) कि.मी 5/600 ते 11/500 मधील रस्त्याची सुधारणा करणे-500 लक्ष,माहुर रेणुकादेवी दत्तशिखर मांडवा वानोळा मेंडकी मुंगशी निचपुर राजगड रस्ता प्रजीमा-5 ची किमी 20/000 ते 21/000 मध्ये रस्त्याची सुधारणा करणे-325 लक्ष

माहुर रेणुकादेवी दत्तशिखर मांडवा वानोळा मेंडकी मुंगशी निचपुर राजगड रस्ता प्रजीमा-5ची किमी 21/000 ते 23/000 मध्ये रस्त्याची सुधारणा करणे-250 लक्ष. 

अशा एकूण ११ ठिकाणी ४० कोटींच्या विविध विकास कामांचे भूमीपूजन यावेळी आमदार भीमराव केराम यांच्या हस्ते संपन्न झाले. 

यावेळी भाजपाचे ज्येष्ठ नेते अनिल वाघमारे,नगरसेवक सागर महामुने,ज्येष्ठ नेते सुमित राठोड ता.अध्यक्ष कांतराव घोडेकर,नगरसेवक राजेंद्र केशवे,अनिल तिरमनवार, विजय आमले, नागोराव सुर्वे,दिलीप मुनगिनवार,जीवन अग्रवाल,राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ता. अध्यक्ष सुदर्शन नाईक,विनोद सूर्यवंशी यासह महायुतीचे अनेक महीला व पुरुष पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Share This Article
error: Content is protected !!