पैनगंगेवरील २२२ कोटींच्या उच्च पातळी बंधाऱ्याचे व विविध ४० कोटींच्या विकास कामांचे आ. केराम यांच्या हस्ते भूमीपूजन संपन्न
विरोधकांच्या गोटात चिंतेचे वातावरण
आ. केराम यांना विरोधी पक्षांपेक्षा भितरघातचा धोका अधिक
नांदेड जिल्हा प्रतिनिधी/बजरंगसिंह हजारी
दि.१५ऑक्टोबर : राज्यात निवडणूक आयोगाकडून विधानसभा निवडणुकीची कोणत्याही क्षणी आचारसंहिता लागू होऊ शकते, क्रिकेट मध्ये जसा फलंदाज सुरुवातीपासून कस्सून पण जपून शेवटपर्यंत पीचवर टिकून राहण्याला जेवढे महत्त्व आहे त्याचप्रमाणे शेवटच्या स्लॉग ओवरमध्ये कशी ताबडतोड आणि धुव्वांधार फलंदाजी करुन मॅच जिंकून देतो यालाही तेवढेच महत्व आहे. हाच निश्चल, निश्चित आत्मविश्वास घेऊन आमदार केराम यांनी आचारसंहिता लागण्याच्या अगदी शेवटच्या काही तासांआधी पाच वर्षे राजकीय मैदानावर बॅटींग करत कोट्यवधींची विकास कामे मतदारसंघात खेचून आणत असताना जणू शेवटच्या अटीतटीच्या ओवर मध्ये आपले शतकही पूर्ण केले व सामनाही जिंकून दिला असल्याच्या राजकीय प्रतिक्रिया भूमीपूजन स्थळी किंबहुना संपूर्ण किनवट/माहूर विधानसभा मतदारसंघ ऐकावयास मिळत आहेत.
त्यामुळे विरोधकांचे आणि त्यातल्यात्यात भितरघात, अंतरघात करण्यासाठी टपलेल्या केराम विरोधकांचे नक्कीच धाबे दणाणले असून, विरोधात नॅरेटीव प्रचार करणाऱ्या विरोधी पक्षाच्या नेत्यांचे केराम यांनी मतदारसंघात कोट्यावधींची विकास कामे खेचून आणत मनसुबे साफ फेल केले असल्याने विरोधीपार्टीच्या गोटात प्रचंड खळबळ उडाली असल्याचे प्रतिक्रियारुपी चित्र दिसून येत आहे.
माहूर शहरातील हजारो नागरीकांसह गडावर देवदर्शनासाठी येणाऱ्या लाखो भाविकांची पिण्याच्या पाण्याची तहान भागविण्यासाठी वरदायिनी म्हणून ओळखली जाणारी लगतच्या मराठवाडा व विदर्भाच्या सीमेवरुन वाहणारी धनोडा येथील जलदायिनी पैनगंगा नदीवर २२२ कोटी रुपये खर्चून बांधण्यात येणाऱ्या उच्च पातळी बंधाऱ्याच्या कामाचे व माहुर तालुक्यातील ११ ठिकाणच्या ४०कोटींच्या विविध विकास कामांचे भूमीपूजन सोमवार
दि.१४ ऑक्टोबर रोजी सकाळी ११.०० वा.पासून दुपारी उशीरापर्यंत
आ.भीमराव केराम यांच्या हस्ते भाजपा,शिवसेना व राष्ट्रवादी महायुती किनवट/माहूर विधानसभा यांच्या संयुक्त आयोजनातून उत्साहात संपन्न झाले.
आमदार भीमराव केराम यांच्या विकासात्मक दृष्टीकोनातून त्यांनी या भागातील अपुऱ्या विविध पायाभूत व मुलभूत सोईसुविधेकडे शासनाचे लक्ष वेधून कोट्यवधी रुपये विकासकामांच्या निधीची जणू ‘विकासगंगा’ या किनवट व माहूर तालुक्याकडे वळविली असल्याचे त्यांनी आपल्या कारकिर्दीत न भूतो, न भविष्यती केलेल्या भरमसाठ विकासकामांवरुन स्पष्ट दिसून येत आहे.त्याचाच एक भाग म्हणून सोमवारी सकाळी ११ वाजता धनोडा येथील पैनगंगा नदी पात्रात २२२कोटी रुपये खर्चून बांधण्यात येणाऱ्या उच्च पातळी बंधाऱ्याचे व माहूर तालुक्यातील ११ विविध ठिकाणी ४० कोटींच्या विकास कामांचे भूमीपूजन आमदार भीमराव केराम यांच्या हस्ते अनेक मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत मोठ्या हर्षोल्हासात आणि धुमधडाक्यात संपन्न झाले.
या उच्च पातळी बंधाऱ्याच्या कामामुळे परिसरातील शेतकऱ्यांच्या शेतीसह माहूरगडावरील व्यावसायिक, येणारे भाविकांसह,शहरातील नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आता कायमस्वरूपी निकाली निघणार असल्याने नागरिकांमधून आमदार भीमराव केराम यांचे आभार मानले जात आहे.
दरम्यान, दुपारनंतर आमदार भीमराव केराम यांच्या हस्ते तालुक्यातील ४० कोटींच्या विविध ११ विकास कामांचे भूमीपूजन देखील संपन्न झाले.
यावेळी आमदार भीमराव केराम यांच्या हस्ते संपन्न झाले.
यावेळी भाजपाचे ज्येष्ठ नेते अनिल वाघमारे,नगरसेवक सागर महामुने,ज्येष्ठ नेते सुमित राठोड,जीवन अग्रवाल,
ता.अध्यक्ष कांतराव घोडेकर,
नगरसेवक राजेंद्र केशवे,
अनिल तिरमनवार,विजय आमले,नागोराव सुर्वे,दिलीप मुनगिनवार,सुदर्शन नाईक,
विनोद सूर्यवंशी यांसह भूमीपूजन स्थळी संबंधित गावचे सरपंच,पदाधीकारी,
प्रतिष्ठीत नागरीक व ग्रामस्थ, महायुतीचे महीला व पुरुष पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी बोलताना आमदार केराम यांनी विरोधकांचा खरपूस समाचार घेतांना सांगितले कि,
*”काही लोकप्रतिनिधी काम कम बातें ज्यादा करतात, मी त्यातला नसून, काम ज्यादा बातें कम करता हूँ.” असा टोला विरोधकांना लगावत “मेरे नाम में ‘भीम’राव एकबार ‘राम’जी, के’राम’ दोबार आता हैं, बावजूद इसके मैं सर्वधर्मसमभाव का पुरस्कर्ता हूँ, इसलिए ‘काम’ सभी के करता हूँ, और ये पारखी जनता सब देख रही है. “आणि म्हणून पाहिजे पुन्हा एकदा भीमराव रामजी केराम” असे जनता म्हणत असल्याचे सांगत विरोधकांचे आपल्या अभ्यासपूर्ण वास्तवव्याख्याननाने कान टोचले.
असे असले तरी, राजकारणात विविध विचारसरणी, तत्वे असणारे विविध राष्ट्रीय वा प्रादेशिक राजकीय पक्ष आहेत.पक्षाची घटना, तत्वे व विचारसरणी भिन्न असल्यामुळे एकमेकांचे राजकीय वैरी विरोधक हे सरळसरळ ओळखले जातात. परंतु, पक्षातच राहून फक्त स्वार्थासाठी आपल्या प्रमुखाला बदनाम करण्यात आसुरी आनंद भोगणारे काही महाभाग देखील असतातच आणि त्याचे प्रमाण प्रत्येकच पक्षात असल्याचे दिसून येत असले तरी, माहूर किनवट विधानसभा मतदारसंघातील महायुतीच्या किंबहुना राष्ट्रीय पक्ष असलेल्या तथा याठिकाणी सत्तास्थानी असलेल्या भारतीय जनता पक्षात ते अधिकच असल्याचे राजकीय वर्तुळात चर्चिले जाते.बीना आग के धुआं नहीं निकलता म्हटले प्रमाणे या गोष्टींकडे पक्षाच्या वरीष्ठ स्तरावर दिलजमाई घडवून आणण्याची गरज असून, तूर्त तरी केराम यांना विरोधी पक्षांपेक्षा पक्षातील असंतुष्ट “भितरघात – अंतरघात मंडळी” यांचाच अधिक धोका असल्याचे दिसून येते. नसता, “हमें तो अपनों ने लुटा, गैरों में कहाँ दम था।” असे म्हणण्याची दुर्दैवी वेळ येऊ नये.वेळेवर मारलेला एक टाका अधिक फाटल्यावर शिवण्यापेक्षा केंव्हाही बरा हे ही तेवढेच खरे.